नागपूर ः कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका फुफ्फुसाला असून या अवयवाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे प्या, असा सल्ला राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी दिला.
महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या नुकताच पार पडलेल्या 'कोव्हिड संवाद' फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या ‘फुफ्फुसाचे आजार आणि कोव्हिड’ या विषयावर बोलत होते. अनलॉकमुळे सर्व दुकाने, आस्थापना, औद्योगिक कारखाने, थर्मल पॉवर प्लांट्स आदी सुरू झाल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढले. यातूनच कोरोनाचा धोकाही वाढला. जुना दमा, क्षय, अस्थमा, सीओपीडी, लंग्स फायब्रोसिस, फुफ्फुसामधील होणाऱ्या बिघाडामुळे होणारा उच्च रक्तदाब यासोबतच ५५ वर्षावरील रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, मुत्रपिंड, यकृताचे आजार असलेल्यांना कोरोना होण्याची जोखिम जास्त आहे.
कोरोना हा शरीरातील सर्वच अवयवांवर प्रहार करतो, मात्र यात सर्वाधिक धोका हा फुफ्फुसाला असून कोरोनाचे लवकर निदान, त्वरीत उपचार हाच बचावाचा मंत्र असल्याचे डॉ. मीना देशमुख आणि डॉ.आदित्य परिहार यांनी सांगितले. फुफ्फुसासंबंधी आजार असल्यास आणि त्याचे उपचार सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कुठलीही औषधे घेउ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज सकस आहार घ्या. ताजी फळे, हिरव्या भाज्या, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी यासह दुध, दही, आले, लसून, अंडी, चिकनचा आहारात समावेश करा. तेलकट पदार्थ, जंकफूड, मैद्याची पदार्थ खाणे कटाक्षाने टाळाको. यासोबतच शरीराला पुरेशे प्राणवायू मिळावे यासाठी नियमित व्यायाम करा.
फुफ्फुसाशी संबंधित व्यायाम करा. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसावर प्रहार करीत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन धोका आणखी वाढू नये यासाठी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या, असा सल्ला त्यांनी दिला.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.