नागपूर

MSRTC QR Payment: आता एसटीतही करा गूगल-पे, फोन-पेचा वापर! क्यूआर कोड स्कॅन करून देता येणार तिकिटाचे पैसे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऑनलाइन देता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Online Payment in MSRTC Bus: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऑनलाइन देता येणार आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट सुटणार असून, जागेवर बसून वाहकाकडील मशिनवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि आपले तिकीट घ्यायचे. त्यामुळे प्रवासी आणि एसटीला याचा फायदा होणार आहे.


राज्यातील सर्व विभागातील आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना नुकतेच कळविले आहे. आज चहावाल्यापासून मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाइन पैसे देवाण- घेवाण करण्याची सुविधा आहे. मात्र, दररोज लाखो रुपयांचे कलेक्शन असलेल्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ऑनलाइन सुविधा का नाही, असा प्रश्न प्रवाशांकडून अनेकवेळा उपस्थित केला जात होता.

एसटीतही दररोज सुट्टे पैशावरून प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद होत असे. त्यामुळे एसटी विभागाने माहिती तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यात क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची व्यवस्था सर्व बसमध्ये करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तर, पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबीट व क्रेडीट कार्डवरून देखील तिकीट काढण्याची सोय केली जाणार आहे. तसेच, वाहकांना देखील आता रोख पैसे जास्त बाळगावे लागणार नाहीत. एसटी महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पैसे कमी झाल्यास तक्रारीची सोय
ऑनलाइन तिकीट काढताना कोणतेही पैसे कमी झाले आणि तिकीट न आल्यास प्रवाशांना मदत मिळणार आहे. त्यासाठी एसटीकडून '४००' हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. तसेच, नागरिक ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क साधू शकतात. (Latest Marathi News)

एसटी महामंडळ तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट मिळावे म्हणून पहिल्या टप्प्यात क्यु आर कोड स्कॅन करून तिकीट देण्यात येणार आहे. पुढे जाऊन डेबिट, क्रेडिट कार्ड वरून देखील प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना चिल्लर पैसै परत करण्यापासून वाहकाची मुक्तता होणार आहे.
- नंदकिशोर मसराम
बसस्थानक प्रमुख, हिंगणघाट जि. वर्धा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT