नागपूर

Washim To Nagpur Railway: रेल्वेचा अकोल्यात होणार बायपास! वाशीमकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी सुविधा

सकाळ डिजिटल टीम

Washim to Nagpur Railway Bypass via Akola: अकोला-पूर्णा मार्गावरील रेल्वे गाड्यांना नागपूरकडे जाण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर बायपास मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, त्यासाठी निधीही मंजूर केला आहे.


अकोला रेल्वे स्थानकावर भुसवाळकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी थेट मार्ग आहे. मात्र, वाशीमकडून येणाऱ्या व नागपूकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी थेट मार्ग नसल्याने अकोला रेल्वे स्थानकावर इंजन बदलण्यासाठी गाड्यांना दीर्घ थांबा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर वाशीमहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी बायपास रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली आहे.

त्यासाठी अंतिम सर्वेक्षण केले जाणार असून, त्याकरिता आठ किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. अंतिम सर्वेक्षणाकरिता रेल्वे मंत्रालयाने दक्षिण मध्ये रेल्वे विभागाला १६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा बायपास तयार झाल्यानंतर नागपूर, अमरावतीहून पंढरपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, जालना आदी शहरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर दीर्घ थांबा घेण्याची व लोकोमोटीव्ह रिव्हर्सलची गरज पडणार नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस जवानांना वाहिली आदरांजली

SCROLL FOR NEXT