Water purification project in Katol is still shut off from last 15 years  
नागपूर

तब्बल ६ कोटी खर्चूनही 'त्या' गावांतील नागरिक अजूनही तहानलेलेच; जलशुद्धीकरण प्रकल्प बनले अवैध कामांचा अड्डा 

संजय आगरकर

कोंढाळी (जि. नागपूर ) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भष्ट्र आणि मनमानी कारभाराने काटोल तालुक्यातील धरतवाडा पाणीपुरवठा योजनेचा बट्याबोळ झाला आहे. काटोल कोंढाळी मार्गावर पंचधार गांवासमोर तब्बल  6 कोटी रूपये खर्चाचे जलशुध्दीकरण प्रकल्प गेल्या 15 वर्षा पासुन बेवारस पडले आहेत.  येथील बहुतांश मोटरपंप आणि सर्व साहित्य चोरीला गेले आहे. बंद पडलेला जलशुध्दीकरण प्रकल्प अवैध व अनैतिक कामांचा अड्डा बनला आहे.

काटोल तालुक्यातील  बहुतांश पाणीपुरवठा योजना फेल झाल्या आहेत. कोट्यवधी रूपये खर्चाच्या नळयोजनेचा लाभ जनतेला होण्याऐवजी जीवनप्राधिकरणाचे अधिकारी आणि संबधित ठेकेदारालाच झाला आहे. काटोल कोंढाळी मार्गावर जवळपास 15 वर्षापुर्वी शासनाने 6 कोटी रुपये खर्चाची धरतवाडा पाणी पुरवठा योजना मंजुर केली  या पाणीपुरवठा योजने अंतर्गत काटोल तालुक्यातील धरतवाडा, पंचधार, कचारी  सावंगा,वाई (बु), वाई (खुर्द), मरकसुर, चिखली (रबडे), चिखली (माळोदे), आलागोंदी, वाजबोडी, मेटपाजंरा, कोंढासावळी, मेढेपठार(बाजार), मेढेपठार (जंगली), आजनगांव, रिधोरा, सोनपूर आदी एकुण 16 गांवानी जाम नदी प्रकल्प येथुन पाणीपुरवठा करण्याची योजना होती. 

जाम प्रकल्पानजीक पंचधार गांवा समोर एका उंच डेकडी वर कोट्यावधी रूपये खर्च करून 3 लक्ष 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले . या जलशुद्धीकरण  प्रकल्पात  तब्बल 30 अश्व शक्तीचे मोटरपंप, विधुत पॉनल, मोटरपंप ब्लिचिंग सिलेन्डर अशी पाण्याचे शुध्दीकरण करण्याची आधुनिक यंत्रणा होती.  

आज बहुतांश सर्व चोरीला गेली आहे. या नळयोजनेच्या संपूर्ण कामात मोठा भष्ट्राचार झाला  तसेच नळयोजनेचे काम मंजुर करतांना जीवनप्राधिकरण ने एकाही ग्राम पंचायतला माहिती दिली नाही आणि नळयोजनेचे काम करण्यात आले असा आरोप होत आहे. .जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत 2008 मध्ये पाणी आले पण जलशुध्दीकरण प्रकल्पापासुन गांवापर्यत नित्कृष्ठ वितरण पाईप लाईन आणि या नळयोजनेतील तांत्रिक दोषामुळे अनेक गांवाना या पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचलेच नाही. 

या योजने अंतर्गत येणाऱ्या कचारी सावंगा येथे तेव्हा अशोक भेलकर सरपंच व दलिपसिंह राठोड हे ग्रामसेवक होते. अशोक भेलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार या नळयोजनेचे काम तर नित्कृष्ठ झाले पण ऐवढी मोठी नळयोजना चालविण्याचा खर्च या सर्व ग्रामपंचायतीना परवडणारा नव्होता कारण सर्व 16 गांवे ही लहाण लहाण होती  म्हणुन 6कोटी रूपयांची ही  मोठी योजना न चालताच बंद पडली.  कोंढाळी गांवाला जाम प्रकल्पात भरपुर पाणी असतांना 1990 मध्ये झालेल्या जाम प्रकल्प ते कोंढाळी पर्यत 6 इंच व्यासाची वारवार फुटणारी सिमेंटची पाईप लाईनमुळे दरवर्षि पाणी टंचाईचा फटका बसत होता . 

काटोलचे आमदार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रयत्नाने 2010 मध्ये 10 कोटी रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा आणि राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत कोंढाळीकरीता  मंजुर केली.  तेव्हाच धरतवाडा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा उपयोग कोंढाळी च्या नविण पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण प्रकल्प म्हणून करावा अशी मागणी स्थानीय जनप्रतिनिधीनी जिवनप्राधिकरण कडे केली त्यामुळे  कोंढाळी च्या पाणीपुरवठा योजनेचे  जवळपास 5 कोटी रूपये वाचले असते पण  जिवनप्राधिकरण ने ही मागणी मंजुर केली तर नाही.

कोंढाळी नजीक कोंढाळी ग्रामपंचायत च्या जुन्या जलशुद्धीकरण प्रकल्प लगतच कोट्यावधी रूपये खर्च करून नविण जलशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले.  कोंढाळी च्या 10कोटी रुपयांच्या नळयोजनेचाही बट्याबोळ जिवनप्राधिकरण ने केला. जाम प्रकल्पात कोंढाळीच्या नविण पाणीपुरवठा योजनेत मंजुर विहिर जिवनप्राधिकरण ने तयार केली नाही जुन्याच विहिरीचा वापर केला पण भष्ट्राचार कारायला मिळणार नाही म्हणुन धरतवाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा उपयोग कोंढाळी करीता केला नाही. 

आज  कोंढाळीच्या नवीन पाणीपुरवठा  योजनेला 10 वर्ष होऊनही ही योजना अपुर्ण आहे. कोंढाळी गांवात अंतर्गत पाईप लाईन टाकली नाही कोंढाळी ग्रामपंचायतीला या अर्धवट अंतर्गत पाईप लाईनमुळे जवळपास आजपर्यत 50 लाख रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती कोंढाळी चे ग्रामविकास अधिकारी दिलिपसिंह राठोड यांनी दिली. जीवनप्राधिकरणच्या भष्ट्र व मनमानी कारभाराने काटोल तालुक्यातील नळयोजना फेल झाल्या आहे असेही आरोप करण्यात येत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT