Weather Update sakal
नागपूर

Weather News : ...तर मॉन्सूनवर होऊ शकतो विपरित परिणाम!

वारंवार बरसणाऱ्या अवकाळीमुळे पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी कमी होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Weather Update : अवकाळी पावसाने मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पावसाचे चक्र मे महिन्यातही असेच सुरू राहिले तर, त्याचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होऊ शकतो. परिणामी पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी कमी होऊ शकते किंवा मधल्या काळात मोठा खंड पडू शकतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही विचित्र परिस्थिती विदर्भातील बळीराजासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. उल्लेखनीय म्हणजे, हवामान विभागानेही यंदा जेमतेम पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करीत असलेले चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे म्हणाले, मॉन्सूनचा पाऊस साधारणपणे उन्हावर अवलंबून असतो.विदर्भात जेवढे कडक ऊन व जमीन तापेल, तेवढा पावसाळ्यात अधिक पाऊस पडतो. दुर्दैवाने यंदा आतापर्यंत तरी तीव्र उन्हाळा जाणवला नाही. मधल्या काळातील दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता अख्ख्या एप्रिल महिन्यात पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्या अगोदर मार्चमध्येही कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण होते. विदर्भात आणखी आठवडाभर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT