Death in Accident sakal
नागपूर

Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यासाठी बुधवार ठरला ‘संकट’ वार; वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये बुधवारी (ता.७) चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये बुधवारी (ता.७) चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रामटेक तालुक्यातील शितलवाडी येथे एका व्यापारी तरुणाचा विजेचा शॉक लागून तर नागपूर-छिंदवाडा रेल्वेतून तोल गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. हिंगणा मार्गावर सेवानिवृत्त हवालदारास हायड्रॉ क्रेनने उडवल्याची घटना घडली.

विद्युत तारांना स्पर्श झाल्याने गमावला जीव

शितलवाडी - येथील हार्डवेअर व्यापाऱ्याचा स्वत:च्या दुकानाच्या बाजूला इलेक्ट्रिकचा लोखंडी खांब आहे. त्या खांबाच्या अर्थिंगला युवकाचा हात लागण्याने त्यात असलेल्या करंटमुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव अकमल गुलाम मुस्तफा शेख (वय २६, देवलापार) असे आहे.

अकमल यांचे देवलापारला मार्केटमध्ये हार्डवेअरचे दुकान आहे. समोर असलेल्या लोखंडी खांबाजवळ तो उभा होता. त्याचा खांबाला लटकत असलेल्या लोखंडी ताराला हात लागला. त्यात करंट असल्याने त्याला जोरदार धक्का लागला व तो तारांसह खाली पडला. त्याच्या बाजूचे चिकन व जुने दुचाकी वाहन विकणाऱ्याचे दुकाने बंद होते.

तो ज्या ठिकाणी पडला त्यासमोर मोटरसायकल असल्याने तो कुणालाही दिसला नाही. त्यामुळे याची माहिती न मिळाल्याने काही वेळातच तो जागीच गतप्राण झाला. त्याचे वडील काही महिन्यांपर्यत मश्जिदमध्ये मौलाना होते. त्याला एक बहीण आहे. गेल्या १० महिन्यांपूर्वी अकमलचे लग्न झाले होते. तो घरात कर्ता असल्याने आई-वडिलाचा सहारा होता.

अकमलच्या मृत्यूने नातेवाईकांसह मित्र परिवार व गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या खांबावर गेल्या अनेक महिन्यांपासून तारा लटकत आहेत. जी तार लटकत होती ती अर्थिग तार होती. अनेकदा तक्रारी करूनही महावितरणने याकडे दुर्लक्ष केले.

याच ठिकाणाहून एका दुकानातून अनेक ठिकाणी विजप्रवाह दिलेला आहे. याची जाणीव विभागाला असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यानंतर लगेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सर्व तारा व वायर काढून घेतले.

नागपूर-छिंदवाडा रेल्वेतून तोल गेल्याने वृद्धाचा मृत्यू

खापा - नागपूर-छिंदवाडा पॅसेंजर रेल्वेगाडीने सावनेरला नातेवाईकांनाकडे येत असतांना सावनेर शिवारात तोल गेल्याने पाय घसरून पडल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.७)सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत दसरू गुलाब ऊईके (वय७१)असे मृताचे नाव असून चंदनगांव (तालुका चौराई, जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दसरू हा छिंदवाडा येथून नागपूर-छिंदवाडा रेल्वे पॅसेंजरने सावनेर येथील नातेवाईकांकडे जात असतांना सावनेर शिवारात दसरू यांचा तोल गेल्याने घसरून पडून रेल्वेच्या चाकात पाय गेल्याने त्यांचा पाय कटला. पटरीवरून फरफटत गेल्याने जबर मार लागला व ते गंभीर जख्मी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती सावनेर पोलिसांना मिळताच सावनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हितेशदादा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पुढील तपास सावनेर येथील ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय संजय शिंदे व मोरेश्वर नागोसे करित आहेत.

ट्रॅक्टर उलटल्याने झाला घात

शितलवाडी - शेतात धान रोवणीसीठी चिखल करीत असताना ट्रॅक्टर उलटला आणि त्या ट्रॅक्टरखाली दबल्या गेलेल्या चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरबाहुली शिवारात मंगळवारी (ता.६) दुपारी २.३० घडली. दिलीप बिसनाथ आहाके (४२, रा. चोरखुमारी, ता. रामटेक) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

संदीप ठवरे यांची चोरबाहुली (ता. रामटेक) शिवारात शेती आहे. त्यांना धानाची रोवणी करायची असल्याने त्यांनी चिखलणी करण्यासाठी ट्रॅक्टर बोलावले होते. दिलीप त्यांच्या शेतात एमएच-४०/बीजे- ७९२८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने चिखलणी करीत होता. दरम्यान चिखलात ट्रॅक्टर अडकल्याने तो काढण्यासाठी दिलीपने वेग वाढविला आणि ट्रॅक्टर अचानक उसळून उलटले. यात दिलीप ट्रॅक्टरखाली दबला गेला.

परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला ट्रॅक्टरखालून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जेसीबी मशीनच्या मदतीने ट्रॅक्टर सरळ करून दिलीपचा मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

सेवानिवृत्त हवालदारास हायड्रॉ क्रेनने उडवले

हिंगणा - घरून ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या सेवानिवृत्त हवालदारास वाटेत हायड्रॉ क्रेनने धडक दिल्याने चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी( ता.७) सकाळी ९.३० च्या सुमारास हिंगणा मार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर आयसी चौक येथील तकिया दर्ग्याच्या बाजूला घडला.

नारायण हरिभाऊ नाईक ( ८५, रा. गेडाम ले आउट, आय सी चौक, हिंगणा रोड नागपूर) असे मृताचे नाव असून ते राज्य राखीव दल गट चारमधून हवालदार पदावरून निवृत्त झाले होते. ते दररोज नेहमी मॉर्निंग वॉकला जात असत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते सकाळी ९ वाजता घरून निघाले.

आयसी चौक येथून एमआयडीसी सर्व्हिस रोडने पायदळ जात असताना त्यांना हायड्रॉ क्रेन वाहनाने (एमए ४०, सीएन ७४०१) धडक दिल्याने ते खाली पडले. या क्रेनचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्या मार्गाने जाणाऱ्या काही लोकांना हा प्रकार दिसला. पण वाहनचालक वाहन घेऊन पळून गेला.

तिथे जमलेल्या लोकांनी एमआयडीसी पोलिसांना याची माहिती देताच ठाणेदार प्रवीण काळे, ड्युटी ऑफिसर तिवारी व स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. मृत नारायण नाईक यांचा मुलगा नरेश नाईक सुद्धा पोलिस विभागात कार्यरत आहे. त्याला माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मुलगा नरेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरार वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT