What good in summer tea or coffee 
नागपूर

चहा आणि कॉफी पिल्याने मिळतात हे फायदे अन्...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवस उजाडताच सर्वात अगोदर लागणारे पेय म्हणजे चहा किंवा कॉफी. सकाळच्या वेळी चहा किंवा कॉफीचा घोट घेतल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांचा दिवसच सुरू होत नाही. "मस्तपैकी कडक, मसालेदार चहा दे बरं' असे म्हणून चहाची मागणी बरेचजण करीत असतात. घरी आलेल्या पाहुण्यांनाही चहा घेणार की कॉफी असे विचारले जाते. तसेच चहा व कॉफी म्हणजे ऍसिडिटी आणि निद्रानाश असा शिक्का मारून या पासून दूर राहा असे सांगणारेही आहेत. तेव्हा चहा व कॉफी ही चांगली की वाईट, हे पेये किती प्रमाणात प्यावीत तसेच उन्हाळ्यात याचे किती सेवण करावे, असे प्रश्‍न अनेकांना पडत असतात. चला तर या दिवसांत काय पिणे योग्य राहील याची माहिती घेऊया... 

उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा प्रत्येकजण चहा किंवा कॉफीचा आनंद घेतच असतो. इतकेच नाही तर प्रत्येक घराची सुरुवात ही चहा-कॉफीनेच होत असते. चहा किंवा कॉफीचा घोट घेत गप्पांच्या मैफलीही रंगत असतात. नवीन नवीन विषयावर एक एक घोट घेत चर्चा केली जाते. मागील काही वर्षांपासून लोकांची चहा व कॉफीची चव बदलली आहे. परंतु, त्याचा आनंद घेण्यास ते विसरलेले नाहीत. जणू त्यांची ही जीवनवाहिनीच आहे.

चहा व कॉफी हे दोन्ही पेय मुळीच वाईट नाहीत. कारण, यामध्ये अँटिऑक्‍सिडंटचे प्रमाण जास्त असते. चहातल्या फ्लॅव्हेनॉइड या घटकातून कॅटेचिन हे अँटिऑक्‍सिडंट मिळते तर कॉफीत क्‍लोरोजेनिक ऍसिड हे अँटिऑक्‍सिडंट असते. अँटिऑक्‍सिडंट शरीरातील पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच काही प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, वय वाढण्याशी संबंधित समस्या, अल्झायमर अशा आजारांना प्रतिबंध करतात. त्यामुळे त्या दृष्टीने ही पेये उत्तमच आहेत. 

मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना आपल्या जीवनशैलीसोबत खान-पानसुद्धा बदलावे लागतात. तसेच आहारशास्त्रज्ञ हे उन्हाळ्यात चहा व कॉफीवे सेवन न करण्याचा सल्ला देतात. मात्र, संशोधनानुसार उन्हाळ्यात गरम कॉफी आणि चहा आपल्या शरीराचं तापमान थंड ठेवण्यास मदत करते. ते पेय म्हणून कार्य करते आणि शरीराचे तापमान कमी करते. जेव्हा कोणतीही गरम वस्तू आपल्या शरीरात प्रवेश करते तेव्हा ते संवेदनांना उत्तेजित करते आणि मेंदूला अधिक घाम निर्माण करण्यास सांगते. घाम हे शरीराचे तापमान कमी करते आणि आपल्याला या हवामानाचा सामना करण्यास मदत करते.

कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्‍यता

चहा व कॉफीमधील सर्वात महत्त्वाची त्रुटी म्हणजे या दोन्ही पेयांमध्ये साखर असते. कॅपेचिनोसारख्या कॉफीमध्ये क्रीमही असते. त्यामुळे सतत चहा आणि कॉफी पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात. या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्‍यता असते. हा मुद्दा लक्षात घेतला तर चहा-कॉफी दोन्हीही कमी साखरेचे किंवा साखर न घातलेले घ्यावे. 

चहा व कॉफीला मोठे महत्त्व

भारतीय संस्कृतीत चहा व कॉफीला फार महत्त्व आहे. भारतातील लोक हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात कॉफी पित असतात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात त्याचे पाहिजे तसे सेवन करीत नाही. कॉफीबद्दल विचार केल्यास नागरिक याचा वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेतात. कोल्ड कॉफी शेक कॉफी, हॉट कॉफी अशा वेगवेगळ्या प्रकारची कॉफी लोक आवडीने पित असतात. भारतीय लोकांच्या खाद्य संस्कृतीत चहा व कॉफीला मोठे महत्त्व आहे. 

चहा ठेवते शरीराला सामान्य तापमानात

चहा पिण्याचे बरेच फायदे आहेत. उन्हाळ्यात चहाचे सेवन केल्याने शरीराला सामान्य तापमानात ठेवता येते. चहा केवळ शरीराला आराम देत नाही तर पाचन विकार देखील दूर ठेवते. चहामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारते आणि पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. एक कप चहा शरीरास हायड्रेट करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. गरम चहा पिण्याची इच्छा नसेल तर आपण आइस्ड ग्रीन टी पिऊ शकतो. आरोग्यासाठी देखील ते फायदेशीर आहे. यामध्ये केवळ कॅफिनची योग्य मात्रा नसते तर शरीराची चयापचय देखील सुधारते.

कॉफीमुळे शरीराला मिळते कफीन

कॉफी केवळ शरीराचे तापमान राखत नाही तर रोज कॅफीन देखील मिळवते. शरीराला कार्य करण्यासाठी दररोज ताकद हवी असते. कॅफीन ही कमतरता पूर्ण करते. परंतु, जास्त प्रमाणात कॅफीन हे शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. आपल्याला असे वाटले की कॅफीन घेण्याची गरज नाही तर चहा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : मविआच्या बैठकीनंतर नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT