नागपूर : मुंबईतील जेजे रुग्णालय(j.j. hospital) सोडल्यास राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(medical hospital) व रुग्णालयात मध्ये ‘सजिर्कल रेटीना’(‘Surgical retina)वरील उपचारासाठी रेटिना तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्रासह लाखो रुपयांची यंत्रसामूग्री खरेदी केली. मात्र दोन वर्षांपासून व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्र बंद आहे. यामुळे दोन हजार रुग्णांना या काळात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यंत्र सुरू करण्यासंदर्भात मेडिकल प्रशासन उदासीन आहे.
मेडिकलच्या नेत्र रोग विभागात २५ वर्षांपुर्वी तत्कालीन विभागप्रमुख डॉ. माला कांबळे असताना ''रेटीना''(retina)शी संबंधित रुग्णावर उपचार होत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र डॉ. कांबळे निवृत्त झाल्यानंतर १९९६ मध्ये उपचार थांबले. त्यानंतर तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकारातून २०१६ मध्ये नेत्ररोग विभागात रेटिनावरील उपचार सुरू झाले. यासाठी ओटीसी, लेझर, व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्र खरेदी केले. नागपूर मेडिकलच्या(nagpur medical) २४ वर्षांनंतर नेत्ररोग विभागाला ''रेटीनल सर्जन'' उपलब्ध झाले. सद्या डॉ. वंदना अय्यर यांची नियुक्ती झाली. त्या सद्या कार्यरत आहेत. त्या सद्या कंत्राटीवर आहेत.
रेटिनावरील उपचार कधी होणार सुरू?
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात दर दिवसाला रेटिनाचा तक्रारी घेऊन २५ ते ३० रुग्ण येतात. मधुमेहाचे (diabetes) रुग्णांना रेटिनावरील उपचाराचा मोठा दिलासा मिळाला. यातील ३ रेटिनाच्या रुगणांवर दररोज शस्त्रक्रिया(surgery) मेडिकलच्या नेत्ररोग विभागात होत होती.विदर्भासह मध्यभारतातील रुग्णांना मुख्यत्वे मधुमेहामुळे दृष्टिपटलावरील (retina) रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे ''डायबेटिक रेटिनोपॅथी'' वरील उपचारही मेडिकलमध्ये उपलब्ध होते, त्यावेळी अनेक रुग्णांनी तत्कालिन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांचे आभार मानण्यासाठी शिष्टंडळ त्यांच्या कक्षात पोहचले होते. मात्र अलिकडे व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्र बदल पडल्याने दिड वर्षांपासून रेटिनावरील उपचार बंद पडले.
गरीब रुग्णांना रेटिनावरील उपचाराचा खर्च पेलवणारा नाही. विदर्भासह(vidarbha) पाच राज्यातील गरीबांसाठी मेडिकल वरदान आहे. मात्र शासनाकडून येथील यंत्र बंद पडल्यानंतर सुरू करण्यात येत नाही. यामुळे गरीब रुग्णांना खासगीशिवाय पर्याय नसतो.
- सिद्धांत पाटील,
वंचित, आय टी सेल प्रमुख, नागपूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.