Cancer Prevention Vaccination  Sakal
नागपूर

Cancer Prevention Vaccination : कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण केव्हा सुरू होणार?

गर्भाशयमुख कॅन्सरग्रस्त ६२ हजारांवर महिला आहेत. अशा रुग्णांचा जनजागृती आणि उपचाराअभावी अल्पावधीत मृत्यू होतो.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ९ ते १४ वयोगटातील मुलींना कॅन्सर प्रतिबंधात्मक लस (पॅपिलोमाव्हायरस) देण्याची घोषणा सरकारने विधानसभेत करून कॅन्सरचे रुग्ण तपासणीसाठी राज्यात चतु:सूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप यावरील भारतीय बनावटीची प्रभावी प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला सुरुवात झालेली नाही. ही मोहीम केव्हा सुरू होणार असा प्रश्‍न उपस्थित झालाय.

गर्भाशयमुख कॅन्सरग्रस्त ६२ हजारांवर महिला आहेत. अशा रुग्णांचा जनजागृती आणि उपचाराअभावी अल्पावधीत मृत्यू होतो. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा करून महिलांमध्ये उमेद वाढविली होती. परंतु घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. एचपीव्ही विषाणूचे प्रमाण शरीर संबंध असलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे.

महिलांचा हा छुपा शत्रू असल्याने लवकर लक्षात येत नाही, मात्र लक्षात येतो तेव्हा आजार गंभीर झालेला असतो. यावर इतर देशांत लसीकरणावर भर दिला जातो. एकूण कॅन्सरग्रस्त महिलांपैकी ६ ते २९ टक्के महिला या कॅन्सरने त्रस्त असतात. देशात ५३ पैकी एका महिलेस या आजाराची जोखीम आहे. कॅन्सरबद्दल समाजात जनजागृती आवश्यक आहे.

लक्षणे

  • संबंध ठेवल्यानंतर वेदना

  • संबध ठेवल्यानंतर रक्तस्राव

  • रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव

  • युरिन इन्फेक्शन

  • वजन कमी होणे

  • पायांना सूज येणे

  • आजाराच्या अधिक प्रमाणाची कारणे

  • गरीब ते मध्यम जीवनमान

  • एपीव्ही विषाणूंची जास्त प्रमाणात लागण

  • तपासण्या कमी प्रमाणात होणे

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची प्रकरणे

  • देशात ः -२०२० मध्ये ७५ हजार २०९ प्रकरणांची नोंद - ३३ हजार ०९५ मृत्यू

  • राज्यात ः - २०२० मध्ये महाराष्ट्रात २ हजार ९५२ मृत्यू

मुलींच्या मनात या लशीविषयी काही समज-गैरसमज असू शकतात. त्याविषयीही योग्य जनजागृती होण्याची गरज आहे. गगर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे त्याची लक्षणे सुरवातीला दिसत नाहीत.

यामुळे ही एचपीव्ही लस परिणामकारक ठरते. शासनाकडून मोफत लसीकरण कधी होणार हे माहीत नाही, मात्र काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने सवलतीच्या दरात ही लस दिली जाते. शाळांमध्ये, वस्त्यांमधून प्रतिसाद मिळाल्यास आयएमएतर्फे ही मोहीम सुरु करण्यात येईल.

-डॉ. मंजूषा गिरी, अध्यक्ष- इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT