Where is ESIC hospital in butibori asked jay jawan jay kisan community  
नागपूर

बुटीबोरी कामगार विमा रुग्णालय गायब झाले कुठे? भूमिपूजनाच्या दोन वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे

जितेंद्र वाटकर

टाकळघाट(जि. नागपूर) : बुटीबोरी औदयोगिक परिसरात कामगारांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेत त्यांच्या साठी कामगार विम्याचा दवाखाना (ईएसआयसी) बनवण्यात येईल असे येथील लोकप्रतिनिधी वारंवार आश्वासन देऊन धीर देत होते. परंतु औदयोगिक क्षेत्राची स्थापना होऊन 25-30 वर्षे लोटून गेले तरी आजपर्यंत येथे राज्य कामगार विमा रुग्णालय तयार न झाल्याने कामगार विमा रुग्णालयाची घोषणा हवेतच उडून गेल्याचे दिसून येते.

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्र आशिया खंडात सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जाते.या औदयोगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करीत असून त्यापैकी 35 हजार कामगार हे विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ठ आहे.कामगार व कारखानदार मिळून 6.5% च्या हिशेबाने या क्षेत्रातून दर महिन्याला अडीच करोड रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला जातो परंतु त्याप्रमाणे सोयी सुविधा त्यांना मिळत  नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी या इएसआयसी दवाखान्याला मान्यता दिली.

त्यानुसार 15 जुलै 2018 रोजी केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात 5 एकर मध्ये भव्य 200 बेडच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन केले.त्याकरिता 175 करोड रुपये मंजूर करण्यात आले.अत्याधुनिक रुग्णालयाचे बांधकाम सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा सुद्धा केली होती,परंतु सद्या स्थितीत मात्र संबधित रुग्णालयाचे थांगपत्ता सुद्धा दिसत नाही तसेच भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटूनही परिस्थिती मात्र जैसे थे असून रुग्णालयाचा मंजूर झालेला 175 करोड रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न बुटीबोरी येथील जय जवान,जय किसान या सामाजिक संघटनेने आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

बुटीबोरी औदयोगिक वसाहत येथील शिवतीर्थ येथे जय जवान,जय किसान संघटनेद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे केंद्रीय सचिव अरुण वनकर,बुटीबोरी शाखा अध्यक्ष सुरेश गावंडे,उपाध्यक्ष आशुतोष पाठक,सचिव अभिनव फटींग, अजय खिचडे,अभिजित उप्पलवार,विकास मोरे,पंकज गावंडे व विकास शेंडे आदी जण उपस्थित होते.

 कर्मचाऱ्यांचा प्रचंड अभाव 

बुटीबोरी औदयोगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या असल्याने कंपनीत किंवा रस्त्यावर दररोज अपघात होत असते किरकोळ अपघात झाला तर बुटीबोरी येथील कामगार रुग्णालयात नेले जाते. परंतु अपघात गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला नागपूर येथील सोमवारी पेठेतच दाखल करावे लागते.  नागपूर नेत्यांना रस्त्यातच रुग्ण दगावल्याचे कित्येकदा घडले आहे. परंतु या विमाच्या रुग्णालयाची स्थिती फारच दयनीय आहे. विदर्भातील तीन लाख कामगार व त्यांच्या कुटुंबांना उपचार देण्याकरिता हे एकमेव कामगार रुग्णालय असून  येथे डॉक्टर,नर्ससह कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. येथे डॉक्टर,तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची 250 पदे मंजूर असताना या रुग्णालयात उपचाराच्या अत्याधुनिक साधनांचा अभाव आहे.

घ्यावी लागते सुट्टी 

येथे उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना  औषध व उपचाराकरीता ताटकळत बसावे लागत असल्याने कामगारांना रुग्णालयात दिवसभर सुटी घेऊनच यावे लागते. यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता अत्याधुनिक यंत्रासामुग्रीने सुसज्ज असे कामगार रुग्णालय बुटीबोरी कामगार परिसरात व्हावे अशी मागणी जय जवान,जय किसान संघटनेने पत्रकार परिषदेतून केली आहे.

सद्या च्या स्थितीनुसार मार्च पासून कोरोना नागरिकांच्या डोक्यावर येऊन बसला आहे.लॉकडाऊन च्या नंतर शिथिलता मिळताच नागरिक सरसकट घराबाहेर पडत आहे त्यामुळे कोरोनाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने  हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारासाठी जागा नसल्याने मृत्यू चे प्रमाण वाढत आहे.जवळपास सर्वच हॉस्पिटलमध्ये बेड ची संख्या फुल्ल झाल्याने रुग्णांना उपचार अभावी राहावे लागत असल्याची शोकांतिका आहे.एमआयडीसी बुटीबोरी मध्ये कामगार विमा दवाखाना होणार होता त्याचे भूमिपूजन सुद्धा झाले परंतु काम कुठे अडकले कुणास ठावूक आज या एमआयडीसी बुटीबोरी येथे कामगार विमा दवाखाना तयार झाला असता तर कोरोना च्या संकट समयी रुग्णांना ,कामगार,नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला असता..

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT