हिंगणा : मतदारसंघात कोरोनाबाधित परिसराची पाहणी करून जनतेशी संवाद साधताना आमदार समीर मेघे.  
नागपूर

कां आणि कशासाठी "होमक्वारंटाईन' होण्याची वेळ आली आमदार समीर मेघेंवर, वाचाच...

अजय धर्मपुरीवार

हिंगणा(जि.नागपूर): हिंगणा विधानसभा क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सदयातरी स्थिरावली आहे. मे व जून महिन्यात बाधितांचा आकडा भराभर वाढत असताना तालुक्‍यात चिंतेची परिस्थिती उद्‌भवली. हा आकडा 143च्या घरात पोहोचला. आमदार समीर मेघे यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष भेटी देऊन सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून पाहणी केली. गरजूंना धान्याचा पुरवठा करण्याचा उपक्रम प्रत्यक्ष नागरिकांत जाऊन त्यांनी राबविला. हे सुरू असतानाच डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार अचानक त्यांच्यावर "होमक्‍वारंटाईन' होण्याची वेळ आली.

आमदार मेघेंचा पुढाकार
जिल्हयात सर्वात प्रथम कोरोना रूग्णांची संख्या 143 च्या घरात पोहोचली. प्रतिबंधीतक्षेत्रात कोरोनाबाधीत रूग्णांची सुविधा तपासणीसाठी आमदार समीर मेघे यांनी पाहणी दौरा केला. यामुळे सुरक्षेसाठी त्यांच्या फॅमिली डॉक्‍टरने सात दिवस घरीच विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आमदार "होमक्वारंटाईन' झाले आहे. हिंगणा तालुका कोरोनाचा "हॉटस्पॉट' झाला आहे. एमआयडीसी परिसरातील लोकमान्यनगरापासून कोरोनाची सुरुवात झाली. यानंतर निलडोहमधील अमरनगर, ईसासनी भीमनगर, पारधीनगर, गजानन नगर, कोतेवाडा, गुमगाव, येरणगाव, वानाडोंगरी, मोंढा, टाकळघाट यासारख्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने शेवटी वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोविड केअर सेंटर सुरू केले. नागपूर शहरातील सतरंजीपुरा येथील संशयीत रुग्ण वानाडोंगरीतील सेंटरमध्ये आणण्यात आले होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार समीर मेघे यांनी ठिय्या आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासनाने सर्व 2121 संशयित रुग्णांना नागपुरात हलविले.

अधिक वाचा :लॉकडाउनचा होणार नाही शेतीकामावर परिणाम, काय आहे कारण...

कौटुंबिक डॉक्‍टरांनी दिला सल्ला
कोरोनाबाधित वस्त्यांना सातत्याने भेटी देणे त्यांनी सुरु ठेवले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, विभागीय
अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार संतोष खांडरे, कोविड समितीचे तालुका सचिव उपविभागीय
अभियंता कृष्णमोहन राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव त्यांच्याशी संपर्क ठेवून सातत्याने कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. काही कामानिमित्त त्यांनी नुकताच दिल्ली येथे दौरा केला. यामुळे त्यांच्या कौटुंबिक डॉक्‍टरांच्या सल्यानुसार20 ते26 जुलैपर्यंत "होमक्वारंटाइन' होण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा : ते तुकाराम मुंढे आहेत, डोळयात धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार

अडचणी असल्यास संपर्क साधावा
कोरोना संदर्भात विधानसभा क्षेत्रात काही अडचणी असल्यास जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा.
एक आमदार या नात्याने त्यासाठी प्रयत्नशिल राहणार.
समीर मेघे
आमदार

                                                         संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT