Winter Health Care Sakal
नागपूर

Winter Health Care : ‘क्लायमॅटिक चेंज सिझन’; सर्दी, खोकल्याचा घरोघरी ताप

सकाळ वृत्तसेवा

साधारणतः डिसेंबर आणि जानेवारीचा काळ हा संक्रमणाचा काळ असतो. ‘क्लायमॅटिक चेंज सिझन’ असे या दिवसांना म्हटले जाते. या काळात अनेक आजार डोके वर काढतात. घरोघरी सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण आढळून येतात.

सध्याही घरोघरी तेच चित्र आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोरोनाची भीतीसुद्धा आहेच. त्यामुळे हा सर्दी-खोकला साधा की संक्रमणाचा हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. अशावेळी घाबरून न जाता खबरदारी आणि योग्य उपचार घेणे गरजेचे ठरते.

साधा सर्दी-खोकला संक्रमण तर नव्हे?

  • फक्त सर्दी-खोकला असेल कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे असे उपाय केले पाहिजेत.

  • सर्दी-खोकल्यासोबत ताप असेल तर वरील उपायांसोबत तापाची एखादी गोळी तुम्ही घेऊ शकता.

  • तीन दिवसांत या उपचारांनी आरामच होत नसेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

  • कडाकाच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटवल्या जातात. फटाक्यांच्या धुरामुळे श्वासासंबंधित समस्या वाढतात. त्यामुळे शक्यतो यापासून दूर राहिले पाहिजे.

टाळलीच पाहिजे गर्दीची ठिकाणे

संक्रमणाच्या काळात साथरोगांचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे अशावेळी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. सध्या लग्नसमारंभ, मोठ्या गर्दीचे कार्यक्रम यात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळेच साथरुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

अशा कार्यक्रमांमध्ये जाणे गरजेचे असेल तर वेळोवेळी हात स्वच्छ करणे, तोंडाला मास्क लावणे, खोकला असणाऱ्या व्यक्तींपासून अंतर राखून बोलणे असे साधे उपाय केले पाहिजे. विशेष म्हणजे या दिवसांत गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

फुप्फुसाचे विकार असलेले, अस्थमा रुग्णांची या दिवसांत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित झोप, संतुलित आहारही या दिवसांत महत्त्वाचा आहे. काही शंका असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT