Ajit Pawar_Jayant Patil 
नागपूर

Winter Session: "आमच्यात अंडरस्टँडिंग चांगलंय...", जयंत पाटलांच्या टोल्यावर अजितदादांचं उत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?

विदर्भाच्या प्रश्नांबाबत विधानसभेत प्रस्ताव मांडलाच गेला नसल्यानं त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तूतू मैमै सुरु होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी विरोधकांच्या आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विदर्भाच्या प्रश्नांबाबत चर्चाच झाली नसल्याचं सांगत सरकारला धारेवर धरलं.

यावेळी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये बसून चर्चा सुरु होती. यावेळी जयंत पाटलांनी मध्येच अजितदादांना टोला लगावला. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी आमच्यात चांगली अँडरस्टँडिंग असल्याचं म्हटलं. (Winter Session we have a good understanding Ajit Pawar reply to Jayant Patal in Vidhan Sabha)

विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा

विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, हा विदर्भाचा विषय सत्तारुढ पक्षानं मांडला म्हणून आम्ही मांडला नाही. अर्थमंत्र्यांनी काल बीएसईमध्ये सांगितलं की, आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर मागे घेतो. पण अजून सभागृह संपलेलं नाही, त्यामुळं विदर्भाच्या प्रश्नांवर आजच चर्चा व्हावी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, अशी भूमिका मांडली. (Latest Marathi News)

महिनाभर अधिवेशन घ्या

जयंत पाटील पुढे म्हणाले, विदर्भाच्या प्रश्नावर तुम्ही प्रस्ताव मांडला काय किंवा आम्ही मांडला काय? काय फरक पडतो. दहा दिवसांचं अधिवेशन घ्यायचं आणि सत्ताधाऱ्यांकडून दोन प्रस्ताव आणि विरोधकांकडून दोन प्रस्ताव घ्यायचे एवढं लिमिटेड का ठेवलं आहे. म्हणून आम्ही म्हणत होतो की, एक महिना अधिवेशन घ्या, नागपूरची हवा आम्हाला जास्ती दिवस खाऊ द्या. (Marathi Tajya Batmya)

जयंत पाटलांचा टोला अन् अजितदादांच उत्तर

पाटलांच्या या विधानानंतर अजित पवार आणि फडणवीस यांच्यात बसूनच उत्तर कोण देणार अशी खुसपूस सुरु असतानाच जयंत पाटालांनी अजित पवारांना टोला लगावत म्हटलं की, माझं अजून बोलणं झालेलं नाही तुम्ही बसून ठरवा की कोणी उत्तर द्यायचं. त्यावर अजित पवार उत्तर देताना म्हणाले, बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कसं कुठे बोलायचं कळतं आम्हाला! यानंतर जयंत पाटील खाली बसले. (Latest Maharashtra News)

पुढे अजित पवार म्हणाले, काल कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी होता. अंतिम आठवडा काल आला त्यावेळी विरोधीपक्षाला कळलं होतं की अधिवेशन संपणार आहे. त्यांनी अध्यक्षांना सांगायचं होतं की आम्हाला अंतिम प्रस्ताव द्यायचा नाही.

आतमध्ये वेगळं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा. यामध्ये एकनाथ शिंदे, फडणवीस आम्ही ठरवलं की, विदर्भाबाबत उत्तर आलाच पाहिजे कारण तो त्यांचा अधिकार आहे कारण विदर्भात अधिवेशन सुरु आहे. आम्ही विधानपरिषेद प्रवीण दरेकरांनी सांगितलं होतं की विदर्भाबाबत प्रस्ताव मांडावा त्यांनी सकाळी प्रस्ताव मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT