Assembly Election 2024 sakal
नागपूर

Assembly Election 2024 : महिलांना मिळणार आमदार होण्याची संधी! आघाडी, महायुती घेणार का निर्णय?

Women Empowerment : महिलांना आमदार होण्याची संधी मिळणार असून, सत्ताधारी महायुती निवडणुकीत महिला मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचे सांगत सत्ताधारी महायुती विधानसभा निवडणूक जिंकण्याचा दावा करीत आहे. सत्तेत आल्यास राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दोन हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन महाविकास आघाडी देत आहेत. महिला मतदारांना आकर्षित करणे हेच त्यामागील कारण आहे.

सत्ता मिळविण्यासाठी महिला आणि तरुण वर्गाचे मतदान सर्वच पक्षाला महत्त्वाचे आहे. परंतु, आतापर्यंत नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांनी एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही.

यावेळी किती महिलांना उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. नागपूर शहरात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर आतापासूनच महिला उमेदवारांनी दावा केला आहे. यात पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून संगीता तलमले तर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते आणि माजी अध्यक्ष नॅश अली यांचा समावेश आहे. तर पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातून माजी नगर सेविका निलिमा बावणे आणि माजी महापौर माया इवनाते, माजी महापौर नंदा जिचकार यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली आहे.

आता यापैकी कोणाची लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाचे प्राबल्य आहे. भाजपने पंधरा वर्षे हलबा समाजाला उमेदवार देऊन वर्चस्व मिळविले. भाजपाचा हा गड भेदण्यासाठी आदिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदा पराते यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना महिला काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन पक्षाने बळ दिले आहे. त्यांनी मध्य नागपूरमध्ये आपले कार्यालय थाटून प्रचाराला सुरुवात केली आहे.

भाजप उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात

पूर्व नागपूर एकेकाही काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचा गड मानला जात होता. तो भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी उध्वस्थ केला. सलग तीन वेळा ते येथून निवडून आले. राष्ट्रवादी अजित पवार गटातफें आभा पांडे यांनीही शड्डू ठोकला आहे. पश्चिम नागपूरमध्ये मागील निवडणुकीत कॉग्रेसचे विकास ठाकरे यांनी सुधाकर देशमुख यांचा पराभव करून विजय मिळविला. यंदा या मतदारसंघात भाजप उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात आहे. मात्र, महिला उमेदवार म्हणून माया इवनाते आणि निलीमा बावणे, माजी महापौर नंदा जिचकार यांनी तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसची धडपड होणार यशस्वी?

एकेकाळी मुस्लिमांचा राखीव मतदारसंघ म्हणून मध्य नागपूरला ओळखले जात होते. माजी मंत्री अनीस अहमद यांच्या पराभवानंतर ही ओळख पुसल्या गेली. ती परत मिळवण्याची धडपड काँग्रेसचे काही कार्यकर्ते करीत आहेत. त्यात महिला काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्ष नॅश अली यांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमध्ये संगीता तलमले यांनी आपला दावा भक्कम केला आहे. यांचे जातीय समीकरणही जुळवून येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना हिरवा कंदील दिलेला आहे. मात्र शहर काँग्रेसने त्यांच्या बाबत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT