नागपूर : उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने निराश होऊन गावी परतत असलेल्या मजुरावर काळाने धावत्या रेल्वेतच झडप घातली. दरभंगा एक्स्प्रेसमध्ये (Darbhanga Express) ही दुर्दैवी घटना घडली. पत्नी आणि दोन्ही मुलांच्या विलापाने रेल्वेस्थानकावरील (Nagpur Railway station) उपस्थितांचाही उर दाटून आला. (Worker is no more in Train due to illness)
रवींद्र देवी राय (४१) रा. दुधारघाट, समस्तीपूर, बिहार असे मृताचे नाव आहे. मजुरीकाम करणारा रवींद्र कामाच्या शोधात बंगळूरला गेला होता. पत्नी आणि दोन्ही मुले त्याच्या सोबत होती. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी वाट्टेल तेवढे श्रम करण्याची त्याची तयारी होती. पण, कामादरम्यान तो मानेच्या भारावर पडून गंभीर जखमी झाला. प्राण वाचले असले तरी डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला देत त्यासाठी लाखोंचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
कर्ता पुरुषच अंथरुणाला खिळला अशात पत्नी, मुलांना पैशांची जुळवाजुळव करणे अशक्य होते. खिन्न मनाने सर्वजण गावी परतीच्या मार्गावर निघाले. म्हैसूर - दरभंगा विशेष रेल्वेगाडीच्या कोच क्रमांक एस ८ मधून त्यांचा प्रवास सुरू होता. गाडी नागपूरजवळ येत असताना रवींद्रची प्रकृती खालावली.
कुटुंबीयांच्या सूचनेवरून गाडीतील टीटीईने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. गाडी पोहोचण्यापूर्वीच रेल्वेचे डॉक्टर फलाटावर दाखल झाले. फलाट क्रमांक १ वर ट्रेन थांबताच डॉक्टरांनी तपासले. पण, तोवर मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी याबाबत कल्पना देताच पत्नी आणि मुलांनी विलाप सुरू केला. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयाकडे पाठवून देत अकस्मात मृत्यूची नोंद केली.
(Worker is no more in Train due to illness)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.