नागपूर : चार धामपैकी एक असलेल्या बद्रीनाथच्या दर्शनाला जाण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, आर्थिक स्थिती आणि शारीरिक व्याधीमुळे अनेकांना हिमालयातील सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्रावर जाणे अशक्य असते.
असे भाविक देशातील दुसरे आणि मध्यभारतातील एकमेव श्री बद्रीनाथ मंदिरात जाऊन इच्छा पूर्ण करू शकणार आहेत. हिमालयातील बद्रीनाथ मंदिर हिमच्छादनामुळे सहा महिने बंद असले तरी लोहारपूरा दोसर भवन चौक येथील हे मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून त्याचा जिर्णेाद्धार करण्यात येणार आहे.
उत्तरांचलमधील श्री बद्रीनाथ मंदिर सर्वांच्याच आस्थेचा विषय आहे. त्यामुळे वर्षभर भक्त या यात्रेला जाण्याचा संकल्प करून त्याची वाट पाहतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असल्याने वर्षभरात फक्त सहा महिनेच हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले असते. सहा महिन्यांच्या कालावधीत लाखो भक्त या मंदिरातील बद्रीनारायणाचे दर्शन घेतात.
अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येत असल्याने तत्पूर्वी श्री बद्रीनाथ पट महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानंतर श्री बद्रीनाथाचे मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. नागपूर येथील हे मंदिर वर्षभर सुरू असले तरी त्याच धर्तीवर येथील मंदिरातही अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला श्री बद्रीनारायण पट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या मंदिराचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता आहेत.
मंदिराची स्थापना १९३४ मध्ये झाली
या मंदिराची स्थापना १९३४ साली झाली. दोन भक्त नियमित बद्रीनाथला जाऊन बद्रीनारायणाचे दर्शन घेत होते. शरीर थकल्याने आता अतिशय कठीण यात्रा करणे कठीण असल्याने त्यांचे मन अस्वस्थ झाले होते. दरम्यान, त्यांना स्वप्न पडले आणि नागपुरातच अशा श्रद्धाळूंसाठी बद्रीनारायणाचे मंदिर आहे.
सुरजाबाई दुबे यांनी यात्रेवरून परत आल्यावर आपली संपूर्ण अचल आणि चल संपत्ती दान करून हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. बंद्रीनाथचे मंदिर सहा महिने बंद असले तरी हे मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. देशातील हे दुसरे बद्रीधाम झाले आहे.
या मंदिराचा जिर्णेाद्धार करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. प्रस्तावित मंदिर उत्तरांचल येथील भगवान श्री बद्रीनारायण मंदिराच्या प्रतिकृतीच्या रूपात विकसित करण्याचा मानस आहे. अशी मान्यता आहे की, ज्या प्रकारे उत्तरांचलमधील बद्रीनाथ येथील बद्रीनारायणाचे दर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधान मिळते अथवा पुण्य मिळते तेवढाच लाभ येथील मंदिरातील बद्रीनारायणाच्या दर्शनाने होतो.
- पंडित उमेश गिरिजाशंकर तिवारी, मुख्य पुजारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.