नागपूर

अभिमानास्पद! नागपूर जिल्ह्यातील येनिकोणी गावाला केंद्र शासनाचा 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर

सकाळ डिजिटल टीम

जलालखेडा (जि. नागपूर) : ‘गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल देशा’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वचन खरे ठरविणारे गाव येनिकोणीला नुकताच केंद्र सरकारचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे येनिकोणी गावाने नरखेड तालुक्यासह नागपूर जिल्ह्याची अभिमानाने मान उंचावली आहे.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेले निकष पूर्ण करण्याकरिता नरखेड तालुक्यातील येनिकोणी ग्रामपंचायत २०१४ पासूनच सुरुवात केली होती. गावाची लोकसंख्या जेमतेम १५०० आहे. या अगोदर या गावात समस्यांचा डोंगर उभा होता. भौतिक सुविधाचा अभाव, गावठी दारूचे अड्डे, सट्टा आणि जुगाराचेही गुत्थे चालायचे, जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते. गावातून वाहनाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराईने डोके वर काढले होते. चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्या राजकारणामुळे ग्रामसलोख्याचा प्रश्न होता. परंतू या गावाचा आमुलाग्र बदल झाला, तो २०१४ नंतरच.

ग्रामवासींनी एका उच्च शिक्षित, कार्यकुशल, नियोजनपूर्वक गाव विकासाचा ध्यास घेतलेल नेतृत्व उभारून गावाचा कायापालट करण्याची संधी दिली. दिलेल्या संधीचा व ग्रामवासींनी टाकलेला विश्वास सार्थकी लावून गावाला तालुक्यापासून देशाच्या विशिष्ट पुरस्काराच्या यादीत नाव पोहचविण्याच काम केले. ते माजी सरपंच व कार्यरत उपसरपंच मनिष भैयाजी फुके यांनीच. ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित आहे.

जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्शग्राम तंटामुक्त पुरस्कार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देण्यात आला होता. जिल्हा पञकार संघ, तालुका पञकार संघ, पंचायत समितीचे विविध पुरस्कार, सरपंचसेवा संघाचा पुरस्कार, महाराष्ट्र सरपंच संघटनेचा पुरस्कार, यानंतर आता केंद्र सरकारचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पदरात पाडून घेतला आहे.

आपलं गाव आदर्श व्हाव, स्वावलंबी व्हाव यासाठी गावाच्या शिलेदारांनी व कारभाऱ्यांनी विकासाची ब्लू प्रिंटच तयार केली आहे. यासाठी निधी उपलब्ध करण्याचे विवीध मार्ग शोधले आहे. प्रत्येक वेळी गाव हितार्थ निर्णय घेतले जातात. ग्रामपंचायती सोबतच ग्रामवासियाच्या आर्थिक उत्पन्नाचे सबळीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवासी सुखी संपन्न जिवन जगत आहेत. यासाठी ग्रामपंचायतने ग्रामस्वच्छता, खाली जागेवर वृक्ष लागवड, रस्ते बांधकाम, घरकुलसाठी भूमिहीनाना जमीन पट्टयाचे वाटप, नाल्या बांधकाम, बंदिस्त गटारे, सांडपाणी व्यवस्थापन व वापर, गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्यावर कोल्हापूरी बंधारे, साठवण तलाव, शेत तलाव, पाणलोट व्यवस्थापन, रेनवाटर हार्वेस्टिंग, हागणदारीमुक्त करणे, शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती, सुसज्ज रूग्णालय, पशु चिकिस्तालय, गुरांसाठी वैरण, पाणी हौद, लहान मुलांसाठी सातत्याने लसीकरण, ग्रामपंचायत कार्यालयाची प्रशस्त ईमारत, सामाजिक कार्यासाठी सभामंडप,स्मार्ट शाळा व अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरीता आरओचे पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकगृह,पथदिवे, स्मशानभूमी, चांगले पांधन रस्ते, आधुनिक क्रीडांगण, खुली व्यायामशाळा, सुसज्ज ई वाचनालय, प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण, महीला व युवती याचे सबलीकरण करण्यावर याबाबतीत भर देण्यात आला आहे.

असे वैविध्यपूर्ण उपक्रम, सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यासाठी सरपंच उषा मनीष फुके, उपसरपंच मनीष भैय्याजी फुके, सदस्य रेखा गणपतराव गावंडे, रेखा दशरथ तुमडाम, उज्वला बळवंत राऊत, प्रभाकर उपासराव सलामे, सोमराज भागवत पंचभाई, अर्चना अशोक खापरे हे बिनविरोध निवडून आलेले सदस्य गावाच्या भल्यासाठी राञदिवस राबत आहे. त्यामुळे येणीकोणी ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पर्यंत मजल मारू शकली यात ग्रामवासियाचा सिंहाचा वाटा आहे.

कोणतेही विकासात्मक कार्य करणाऱ्यांसाठी लोक सहभाग खुपच महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यकारिणी संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येक कामातच सहभागी करून घेते. हीच सकारात्मक बाब लक्षात घेत सहभागातून सर्व विकासात्मक कामे करवून घेण्यावर भर देण्यात येतो. त्यामुळेच आम्ही विविध पुरस्कार प्राप्त करून शकलो. यानंतर आदर्श गाव करण्यासाठी आमच्या प्रयत्न आहे.
सौ. उषा मनीष फुके, सरपंच, ग्रामपंचायत, येणीकोणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT