youth lost his life during catch Watercock drowning  Sakal
नागपूर

Nagpur : पानकोंबडी पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तलावात पानकोंबडी पकडण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

रवी ऊर्फ नानू सोहनलाल पंचेश्वर (रा.भांडेप्लॉट) असे युवकाचे नाव आहे. त्यांच्या घरी मोठा भाऊ आणि आई असून तो हातमजुरी करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी तो सक्करदरा तलावाच्या हॉटेल बॉलीवुड सेंटर पॉईन्टच्या पडक्या वास्तूच्या बाजूने पानकोंबडी पकडण्यासाठी तलावात उतरला.

यावेळी तलावातील गाळात त्याचा पाय अडकल्याने तो गटांगळ्या खावू लागला. एका लहान मुलाने हे बघितल्यावर त्याने नागरिकांना माहिती दिली. ते त्याला वाचविण्यासाठी धावले असता, तो बुडाला होता.

दरम्यान सक्करदरा पोलिसांना नियंत्रण कक्षातून याबाब सूचना मिळताच, सहाय्यक पोलिस निरीक्षक नेरकर यांनी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पंचनामा करीत त्याचा मृतदेह मेडिकल रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

SCROLL FOR NEXT