Rohit Pawar 
नागपूर

Rohit Pawar: रोहित पवारांची 'युवा संघर्ष यात्रे'च्या सांगतेनंतर गोंधळ का झाला? रोहित पवार सरकारवर का संतापले?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेची सांगता आज नागपुरात झाली. झिरो माइल शिळेजवळ दुपारी १ वाजता या यात्रेतील शेवटची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी उपस्थिती लावली तसेच सभेत त्यांनी आपल्या भूमिकाही मांडल्या.

पण सभा संपल्यानंतर निवदेन देण्यावरुन गोंधळ निर्माण झाला, त्यामुळं रोहित पवार चांगलेच संतापले आणि ते स्वतः सरकारला निवेदन देण्यासाठी विधानभवनाकडं निघाले. पण पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तसेच काही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जही केला. पण रोहित पवार इतके का संतापले जाणून घेऊयात. Why was there confusion after Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra Why is Rohit Pawar angry with the government)

निवेदन स्वाकारायला भाजप शहराध्यक्ष आल्यानं रोहित पवार संपातले

रोहित पवारांनी स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, पुण्यापासून नागपूरपर्यंत युवा संघर्ष यात्रेत ८०० किमीहून अधिक अंतर पायी चालत युवा वर्ग आला. यावेळी या युवा आणि सामान्य लोकांच्या प्रश्नांचं निवेदन देण्यासाठी विधानभवनाकडं निघाले होते. पण हे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं जबाबदार व्यक्तीला पाठवलं नाही, तर भाजपच्या शहराध्यक्षाला पाठवलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले. या वागण्यातून हे सरकार बेजबाबदार, अहंकारी आणि घाबरट आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच खरं म्हणजे युवा संघर्ष यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या सरकारची घाबरगुंडी उडालीय आणि ये डर अच्छा है, असं त्यांनी म्हटलंय.

दडपशाहीपुढे झुकणार नाही जनतेला न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण न्यायाची मागणी करणाऱ्यांवर जर सरकारकडून पोलिसांना पुढं करुन अशी दडपशाही केली जात असेल तर या दडपशाहीपुढं आम्ही घाबरणारही नाही आणि झुकणारही नाही पण याविरोधात अधिक त्वेषाने लढू आणि जिंकू, असंही रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे.

तसेच राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध करतो असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित पवारांचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. काहींनी पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला तसेच त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रोहित पवारांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न पण त्यामुळं गोंधळाची परिस्थिती आणखीनच वाढली. दरम्यान, रोहित पवारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात यश आलं त्यानंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Case: बदलापूर अत्याचार प्रकरण; तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना जामीन मंजूर, SIT ने घेतलं होतं ताब्यात

माणुसकी हरवली ! "तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी..."; ऐकताच आईचा मृत्यू, नंतर कळलं फेक होता कॉल

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य

SCROLL FOR NEXT