Z.P. School Sakal
नागपूर

Z. P. School: मेळघाटातील शाळेला आयएसओ मानांकन

मलकापूरला आदिवासींच्या लोकवर्गणीने मिळवून दिली अनोखी भेट

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड - गाव तसे दुर्गमच.. गावकऱ्यांची परिस्थितीही बेताची.. वातावरण निरुत्साही.. पण काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीतून शिक्षकांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना गावकऱ्यांची साथ लाभली...आणि स्वातंत्र्यदिनी गावाला अनोखा मान मिळाला.

चिखलदरा तालुक्यातील मलकापूरच्या जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनाची कवायत सुरू असताना शिक्षकाच्या मोबाईलवर आलेल्या संदेशामुळे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकला. कारण आदिवासी समाजातील पालकांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मेळघाटातील पहिली आयएसओ शाळा होण्याचा मान या शाळेला प्राप्त झाल्याचे या संदेशात म्हटले होते.

मलकापूर हे जेमतेम १२३ कुटुंबांचे गाव. इयत्ता पहिली ते पाचवी दरम्यान गावातील ३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मुख्याध्यापक किरण आडे व सहायक शिक्षिका पायल हिंगमिरे यांचे २०१८-१९ या सत्रात शाळेत स्थानांतर झाल्यावर शाळेचे रूपडे पालटण्यासाठी दोघांनी परिश्रम घ्यायला सुरुवात केली.

त्यांच्या प्रयत्नांना मुंबईच्या एम्पथी फाउंडेशनने सहकार्य लाभले. फाउंडेशनच्या सहकार्यामुळे २६ लाखाच्या निधीतून शाळेची टुमदार इमारत उभी झाली.

या शाळेतील स्वच्छतागृह एखाद्या खासगी उद्योगाच्या स्वच्छतागृहाला मागे टाकेल अशा दर्जाचे आहे. सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था झाली.

शिक्षकांनी भौतिक सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला. विविधांगी परिपाठ, भाषा व गणित पेटीचा सुयोग्य वापर यामुळे विद्यार्थी प्रगतिपथावर आहेत. अशातच शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याचा विचार पुढे आला.

आयएसओमधील ८५ उद्दिष्टे पूर्ण करताना आर्थिक अडचण पुढे आली. मात्र, शिक्षकांची प्रामाणिक धडपड बघता आदिवासी बांधवांनी स्वयंपाक भट्टी तर दोनशे, पाचशे रुपये गोळा करत दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची लोकवर्गणी उभी केली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरिता दहीकर यांचे पती जतनलाल ग्रामपंचायत सदस्य असल्याने त्यांनी शाळेला टेबल, खुर्च्या व इतर भौतिक साहित्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. हे प्रयत्न आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आयएसओचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

समर्पित सेवेचे फलित

शिक्षिका पायल हिंगमिरे या दरवर्षी मुलांना लेखन साहित्य, स्वेटर व इतर उपयोगी वस्तू भेट देतात. शाळेसाठी दोन्ही शिक्षकांनी तन, मन, धन अर्पण करून आपल्या सेवाभाव दाखविल्यामुळे मेळघाटातील पहिली आयएसओ मानांकित शाळा होण्याचा बहुमान या शाळेला मिळाला.

गावकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शाळेचा कायापालट झाला आहे. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या सहकार्याने आयएसओचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले.

- किरण आडे, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT