अमरावती : आदित्यजी... आपण राज्याचे पर्यटन मंत्री (Tourism Minister Aditya Thakare) आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (ShivSena chief Balasaheb Thakare) यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. वाटत असेल तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील स्कायवॉकलाही माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र; काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे पत्र खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे. (Navneet-Ranas-letter-to-Aditya-Thakare-for-SkyWalk-in-Chikhaldarya)
मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेतले होते. ७० ते ८० टक्के काम त्यांच्या काळात झाले होते. त्यामुळे विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना होती. मात्र, आता फडणवीस सरकार नाही. त्यामुळे आज ही भावना दिसत नाही. मागील दोन वर्षांपासून स्कायवॉकचे काम रखडले आहे. चिखलदऱ्याला पर्यटनासाठी हजारो पर्यटक येतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात. या स्कायवॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावर असलेल्या काचेच्या प्लटफॉर्मवर उभे राहून ५०० फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे. तेव्हा हे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन नवनीत राणा यांनी पत्रातून केले आहे.
स्कायवॉकचे काम आधी पोलिस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत थांबवले अडविले आणि कित्येक दिवस ते बंदच होते. यातून ते कसेबसे सुटले. आता ते वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वन व वन्य जीव मंडळाच्या कचाट्यात अडकले आहे. वनखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरून हे काम मार्गी लावू शकता, असेही राणा यांनी पत्रात म्हटले आहे.
अचलपूर हे मुख्यमंत्र्यांचे आजोळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा अमरावतीमधील अचलपूर हे आजोळ आहे. तेव्हा या कामात आपण स्वतः लक्ष्य घालून कामाला गती द्यावी. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे स्कायवॉकलाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर आमची हरकत असणार नाही. चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल अशा या स्कायवॉकचे काम पर्यटन मंत्री म्हणून आपण लवकरात लवकर पूर्ण करून आदिवासीबहुल मेळघाट, चिखलदऱ्याला न्याय द्याल, गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगाराची चांगली संधी मिळेल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
(Navneet-Ranas-letter-to-Aditya-Thakare-for-SkyWalk-in-Chikhaldarya)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.