naxal banner found in sakoli of bhandara  
विदर्भ

भंडाऱ्यात एका पत्रकाने उडविली खळबळ, पोलिस दलही लागले कामाला

दीपक फुलबांधे

भंडारा : जिल्ह्याच्या साकोली तालुक्‍यातील उकारा, विरसी व मोखे या ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर 'नक्षली आतंक' या आशयाचे पत्रक लावण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

रत्नाकर पतिराम पारधी (वय 40, रा. मोखे), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रत्नाकर याने शुक्रवारच्या रात्री उकारा, विरसी व मोखे या ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक पत्रक लावले. त्यात 'नक्षली आतंक, चपरासी और रोजगारसेवक अपना राजीनामा दो और अपनी जान बचा लो' असे नमूद करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उजेडात येताच पोलिसांनी तपासकार्याला सुरुवात केली.

याप्रकरणी पारधी याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पिटेझरी गेटजवळ लाल रंगाचे पत्रक पोलिस आढळले होते. त्यात 'नागझिरा में आके देखों' असा धमकीवजा इशारा देण्यात आला होता. आता पुन्हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा प्रकार घडल्याने नागझिरा प्रकरणाशी याचा संबंध आहे काय, याचा तपास पोलिस करीत आहेत. अधिक तपास साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Maharashtra Assembly Election Result : जोगेश्वरी मध्ये लोकसभेनंतर विधानसभेतही फेर मतमोजणीची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल करणार

SCROLL FOR NEXT