गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आठवडाभरात एका व्यक्तीची हत्या व चकमक घडवून आणली. त्यामुळे नक्षल विरोधी अभियान पथकाने नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात आपले अभियान तेज केले आहे.
कोरची तालुक्यातील नवेझरी येथील माजी उपसरपंच याची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलिस मदत केंद्रांतर्गत रेखाटोला जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात एक जवान जखमी झाला.
गडचिरोली पोलिस सध्या कोरोनाच्या बंदोबस्तात आहेत. याशिवाय गरजूंना मदत करण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवादी जिल्ह्याच्या काही भागात सक्रिय झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
हेही वाचा : लॉकडाऊनमध्येही त्याने आईची अखेरची इच्छा केली पूर्ण, मात्र...
गेल्या वर्षभरात नक्षल विरोधी अभियानामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चळवळीतील काही मोठ्या नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसर्पण केल्याने गडचिरोली जिल्ह्यात नक्षल घटनांत कमी आली. हिंसक कारवाई करण्यात अग्रेसर असलेले काही नक्षल दलम जवळपास संपुष्टात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.