nayansari duck found in wardha 
विदर्भ

वर्ध्यातील पक्षी वैभवात भर, प्रथमच आढळले नयनसरी बदक

रूपेश खैरी

वर्धा : पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने सुरू असलेल्या निरीक्षणादरम्यान वायफड गावाजवळील तलावावर जिल्ह्यात प्रथमच नयनसरी बदकांचे दर्शन झाले. ही वर्धेतली पहिलीच नोंद असल्याने वर्ध्यातील पक्षी वैभवात भर पडली आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या स्थानिक व स्थलांतरित संकट समीप प्रजातींच्या यादीमध्ये नवीन नोंद झाली आहे.

फेरुगणीस डक किंवा फेरुजिनस पोचर्ड हे सामान्य नाव असणाऱ्या पक्ष्याचे मराठी नाव नयनसरी बदक, असे आहे. याचे शास्त्रीय नाव अथ्या न्युरोका आहे. या प्रजाती भारतीय उपखंड, आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये स्थलांतर करतात. या बदकाच्या प्रजाती उथळ ओल्या प्रदेशात राहतात. ज्यात हिरव्यागार उगवलेल्या आणि किरणोत्सर्गी वनस्पती असतात. हे दलदलीचा भाग, तलाव, मडफ्लॅट, माशांचे तलाव आणि किनारपट्टीवरील आश्रयस्थानांमध्ये आढळतात.

या बदक प्रजाती डुबकी मारून किंवा पाणी खळवळून आपला आहार घेतात. ते सर्वभक्षी आहेत. जलीय वनस्पती, अपृष्ठवंशी, किडे, घोन्घे, कठीण कवच असणारे आणि लहान मासे खातात आणि सहसा रात्री आहार घेतात. ई-बर्ड या संकेत स्थळावरील नोंदीनुसार विदर्भात यापूर्वी यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात या पक्षाची नोंद आहे. हे बदकं मोठ्‌या संख्येने व प्रामुख्याने भारतात स्थलांतर करून येत नसून तो शेंडी बदक, मोठी व छोटी लालसरी यांच्यासोबत मोजक्‍याच संख्येत विदर्भात येतात, अशी माहिती यवतमाळमधील पक्षी अभ्यासक प्रवीण जोशी, नागपूरचे नितीन मराठे, चंद्रपूरचे रुंदन काटकर आणि वाशिम येथील मिलिंद सावदेकर यांनी दिली. यासोबतच 2004पासून याचे विदर्भात आगमन होत असून राजू कसंबे, जयंत वडतकर, गजानन वाघ, प्रशांत निकम पाटील, सौरभ जवंजाळ, किरण मोरे, रवी धोंगळे, मंगेश तायडे, शिशिर शेंडोकर, शुभम गिरी, कनैया उदापुरे व इतर पक्षीमित्रांनी स्थानिक तलावांवर याची नोंद केली आहे.  या पक्ष्याच्या अभ्यासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीच्या पक्षी निरीक्षणामध्ये वन्यजीव अभ्यासक पराग दांगडे, नितीन भोगल व श्रुष्टी भोगल आणि जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक संजय इंगळे तिगांवकर यांचे सहकार्य लाभले. 

नर मादीचे रंग असतात आकर्षित - 
या मध्यम आकाराच्या बदकाची लांबी 35 ते 40 सेमी आणि वजन 450 ते 750 ग्रॅम असते. नर व मादी दोन्ही गडद तांबूस पिंगट आणि पाठ आणखी गडद रंगाची असते. नर बदकाचे डोळे चमकदार फिकट पांढऱ्या आणि मादीचे तपकिरी रंगाचे असते. पोट आणि पंखांच्या खालचा भाग पांढरा असतो. हे बदक उडाल्यानंतर त्यांच्या वरच्या पंखांवर दोन्ही बाजूने पांढरी पंख पट्टी पाहावयास मिळते. पांढरी पंख पट्टी व नराचे चमकदार फिकट पांढरे डोळे या त्याच्या ओळखण्याच्या प्रमुख खुणा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT