यवतमाळ : गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. रविवारी (ता.27) येथील आर्णी मार्गावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र शासनाचा निषेध नोंदवीत घोषणाबाजी केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
गेल्या दोन वर्षांतील दरवाढ केंद्र सरकारने केली आहे. गॅस, पेट्रोल व डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून गळचेपी करीत आहे. सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केला आहे. सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल 70 रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - दीड वर्षाच्या चिमुकलीने बापाचे अंत्यदर्शन घेताच उपस्थितांनी फोडला टाहो, शहीद कैलास दहीकर अनंतात...
यावेळी जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, शहराध्यक्ष गौरी उजवणे, ज्योती निरपासे, वर्षा आखरे, वंदना मोहितकर, नंदा महल्ले, सुरेखा बोरकर, दीपाली महल्ले, शालिनी कान्हारकर, रंजना आडे, सरस्वती गेडाम यांच्यासह लाला राऊत, योगेश धानोरकर, गुणवंत राठोड, सय्यद जाकीर, स्वप्निल खोब्रागडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.