nirasha enchilwar sakal
विदर्भ

Motivation News : ‘निराशा’च्या जीवनात उजळला आशेचा किरण

सकाळ वृत्तसेवा

बुटीबोरी - घरात चौथी मुलगी झाली, म्हणून नाव ठेवले ‘निराशा’. दारिद्रय आणि घरात कोणी शिक्षण घेत नसल्यामुळे अज्ञानाचा अंधकार. आईवडिलांची छाया डोक्यावरुन हरविलेल्या या मुलीच्या लग्नाला ‘गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया’ या उपक्रमाची एकोणीसवी मदत म्हणून कर्मयोगी फाउंडेशन फेटरी (ता. जिल्हा नागपूर) या गावातील निराशा शिवदासजी ऐंचिलवार यांचे सहकार्य लाभले.

येत्या २ जूनला ‘निराशा’चे लग्न होत आहे. ती सुखी संसारात प्रवेश करणार आहे. निराशाची आई सविताताईंचे शिवदास (सोनी, ता. लाखांदूर जिल्हा भंडारा) यांच्यासोबच १९८७ मध्ये लग्न झाले. वंशाला वारस हवा या प्रतीक्षेत त्यांना भाग्यश्री, रीना, शारदा व निराशा या चार मुली झाल्या. चौथी मुलगी झाली तेव्हा घरचे सर्व निराश झाले. त्यातूनच वडिलांनी चौथ्या मुलीचे नाव निराशा ठेवले.

कुटुंब वाढल्यामुळे घरात गरिबीचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. त्यामुळे सविताताई व शिवदासजी यांनी गाव सोडले व कामाच्या शोधात नागपूरला आले. दोन्ही माणसं मिळेल ते काम करत नागपूर जवळील फेटरी येथे आबादीच्या जागेवर कसेबसे झोपडे उभारून राहू लागले. मोठ्या दोन मुलींना बारावीपर्यंत शिकविले व त्यांचे लग्न लावून दिले.

तिसऱ्या मुलीचे पदवीचे शिक्षण चालू असतांना, मोठ्या बहिणीची तब्येत सातत्याने बरोबर रहात नसल्यामुळे तिचे मोठ्या जावयासोबत लग्न लावून दिले. अशातच कामावर जात असताना डिसेंबर २०१९ मध्ये शिवदासजी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. निराशाचे लग्न करण्यास घरात एकही पैसा नाही. त्यातही दुसऱ्या नंबरची मुलगी रीना दारुडया नवऱ्याच्या त्रासामुळे दोन मुलांसह सासर सोडून माहेरी आली. गावातील धुणीभांडी करून राहू लागली.

संत गाडगेबाबांचे विचार कृतीतून जपले

कुणी मदत करेल, ही आशाच संपल्याने सविताताईंनी स्वतः पुढाकार घेत नागपूर येथील मुलांसोबत निराशाचे लग्न जुळून आणले. मुलाने परिस्थिती जाणून एकही पैसा न घेता तयार झाला. लग्नासाठी बचत गटातून कर्ज घेऊन व कोणाकडून काही उसने पैसे घेण्याच्या धडपडीत असताना सविताताईंची धडपड कमी करण्यासाठी ‘कर्मयोगींनी निराशाच्या लग्नात दहा हजारांची मदत व मानाची साडीचोळी देऊन सविताताईंची हिंमत वाढविली. कर्मयोगीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. प्रशांत कडू यांच्या हस्ते १० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन निराशाला साडीचोळी दिली. अशाप्रकारे ‘कर्मयोगी’ गाडगेबाबा यांचे विचार फाउंडेशनने कृतीतून जपले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT