विदर्भ

परवानगीच्या प्रतीक्षेत ऑक्‍सिजन प्रकल्प गुदमरला; यंत्रणेची दिरंगाई उठली रुग्णांच्या जिवावर

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाने कहर केला असतानाच प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणासुद्धा रुग्णांच्या जिवावर उठला आहे. ऑक्‍सिजनअभावी कोरोना बाधितांना जीव गमावावा लागत आहे. ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. चार महिन्यांपूर्वी वीस हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्‍सिजन प्रकल्प मंजूर झाले. यातील एक परवानगीअभावी थंडबस्त्यात गेला आहे. दुसरा पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे जवळपास पाचशे बेडस ऑक्‍सिजनच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि उपलब्ध यंत्रणा याचा कुठेच ताळमेळ जुळत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. या स्थितीला प्रशासकीय यंत्रणेची बेपवाई सुद्धा कारणीभूत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या तुलनेने कमी असतानाही आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले. त्यावेळी संभाव्य दुसरी लाट गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले.

त्याअंतर्गत ऑक्‍टोबरमध्ये प्रत्येकी वीस हजार लिटरचे दोन ऑक्‍सिजन प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 590 बेडसला ऑक्‍सिजन पोहोचविण्यात येणार होते. चार आठवड्यांत हे प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. परंतु पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरसुद्धा सुरू होऊ शकले नाही. ऑक्‍सिजन प्रकल्पाचे कंत्राट आर्क्‍टिक इन्फ्राटेक सोल्यूशन या कंपनीला दिले. ऑक्‍सिजन पुरविण्याचे काम नागपुरातील आदित्य एअर प्रॉडक्‍ट या कंपनीला देण्यात आले. याकरिता 2 कोटी 38 लाख 15 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला.

5 ऑक्‍टोबर 2020 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला प्लांट सुरू होणे अपेक्षित होते. आज चार महिन्यांहून अधिक काळ लोटला मात्र ही ऑक्‍सिजन यंत्रणा अजून सुरू झाली नाही. हे दोन्ही प्रकल्प शोभेची वास्तू ठरले आहेत. सध्या जिल्ह्यात 640 ऑक्‍सिजन बेड्‌स उपलब्ध आहेत. रुग्णांची संख्या आणि ऑक्‍सिजन बेड्‌सचा ताळमेळ कुठेच जुळत नाही. कोरोना बाधितांचा ऑक्‍सिजनची पातळी घसरली तर त्याला त्वरित त्याचा पुरवठा आवश्‍यक असतो. एका दिवसाचा उशीर झाला तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर पोहोचतो. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे.

हे दोन्ही ऑक्‍सिजन प्रकल्प कार्यान्वित असते तर अनेकांचे जीव वाचले असते. शासकीय रुग्णालयातील ऑक्‍सिजन प्रकल्प काही परवानगी अभावी सुरू होऊ शकला नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने यांनी सांगितले. येथील प्रकल्पात ऑक्‍सिजन उपलब्ध आहे. परंतु बेड्‌सपर्यंत पाइप जोडण्या झाल्या नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT