विदर्भ

नुपूर शर्मांचे समर्थन केल्यानचं अमरावतीत कोल्हेंची हत्या; भाजपचा आरोप

अमरावतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेंच्या (Umesh Kolhe) हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. दरम्यान हत्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्यानं कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यानंतर आता हा तपास एनआयएकडे (NIA) वर्ग करण्यात आला असून, या तपासातून काय बाहेर येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. (Amravati Umesh Kolhe Murder News In Marathi)

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी अनेक राज्यात निदर्शनांना हिंसक वळनदेखील लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदपूर (Udaypur) येथील टेलर व्यावयायिकाची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 21 जून रोजी अमरावती (Amravati) येथील मेडिकल व्यावयायिक असणाऱ्या उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजपने ही हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता.

कोल्हे यांनी फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअपला (Whatsaap) शर्मा यांचं सर्मर्थन करणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या त्यामुळे त्यातूनच कोल्हे यांची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी ही हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी निवेदन देखील दिले होते. त्यानंतर या हत्येचा तपास पोलिसांकडून केला जात होता. मात्र, आता या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे एनआयएच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उदयपूरमध्ये दुकानात घुसून हत्या

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांचं राजस्थानच्या उदयपूरमधील एका टेलर व्यावसायिकाने समर्थन केले होते. त्यानंतर 28 जून रोजी या व्यावसायिकाची दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंत येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे. अशाच प्रकारे 21 जून रोजी कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान आता हे प्रकरण तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT