{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613127729081,"A":[{"A?":"I","A":4.310349325899828,"B":783.038119107958,"D":161.711880892042,"C":49.68965067410017,"a":{"B":{"A":{"A":"MAEV5-nOqQ8","B":1},"B":{ 
विदर्भ

कालबाह्य बसेसमुळे नागरिक अडचणीत; रस्त्यातच बंद पडते बस आणि करावी लागते पायपीट

सकाळ डिजिटल टीम

एटापल्ली (जि. गडचिरोली) : अहेरी आगाराच्या 50 टक्‍के बसगाड्या कालबाह्य झाल्या आहेत. या कालबाह्य बसगाड्या प्रामुख्याने एटापल्ली तालुक्‍यातील विविध रस्त्यांवर सोडण्यात येत आहेत. मात्र, बसगाड्या ठिकठिकाणी बंद होत असल्याने तालुक्‍यातील नागरिकांचा प्रवास खडतर झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

एटापल्ली तालुक्‍यात गट्टा, येमली, चंदनवेली, जारावंडी, आलापल्ली हे प्रमुख मार्ग आहेत. या रस्त्यावर दिवसातून अनेक बसफेऱ्या अहेरी आगाराकडून चालविल्या जातात. हे सगळे मार्ग दुर्गम भागातील आहेत. याशिवाय रस्ते अतिशय खराब आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जाणून बुजून कालबाह्य झालेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. नवीन बसगाड्या या अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्यावर सोडल्या, तर त्या खराब होतील म्हणून हा पर्याय अहेरी आगाराने शोधला आहे. असे असले तरी याचा फटका तालुक्‍यातील जनतेला बसत आहे. 

रस्त्यावर बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. बस नादुरुस्त झाली, तर अहेरी येथून दुरुस्ती करणारी चमू येईपर्यंत बस रस्त्यावर उभी असते. प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत राहावे लागत आहे. अनेकदा बस दुरुस्तच होत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा पर्याय निवडून किंवा कित्येकदा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे चित्र एटापल्ली तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. अहेरी आगाराकडून हे चित्र बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. 

सार्वजनिक बांधकाम विभागला दोष देऊन राज्य परिवहन महामंडळाचे अहेरी आगार वेळ निभावून नेत असले, तरी याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या भंगार बसगाड्यांमध्ये अनेक आसने तुटलेली असतात, सर्वत्र धूळ साचलेली असते, पत्रे तुटलेले असतात, पावसाळ्यात या बसमध्ये पाणी गळते, या सर्व समस्यांमुळे अशा बसगाड्यांमध्ये बसणेसुद्धा कठीण होत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन एटापल्ली तालुक्‍यातील रस्त्यांवर नव्या बसगाड्या उतरवाव्यात, अशी मागणी तालुकावासी करत आहेत.

खासगी वाहनांची मनमानी...

तालुक्‍यात भंगार बसगाड्या चालत असल्याने प्रवाशांना खासगी वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागतो. पण, याचा फायदा खासगी वाहनचालक घेत असून मनमानी करत आहेत. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोंबड्या, शेळ्या, मेंढ्यांप्रमाणे वाहनात कोंबणे, अतिशय वेगाने वाहने चालविणे, प्रवाशांचा नाइलाज बघून अधिक पैशांची मागणी करणे, प्रवाशांशी हुज्जत घालणे, असे अनेक प्रकार खासगी वाहनचालकांकडून होत असतात. त्यामुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT