omni car hit by truck Karanji-Vani road Four killed police yavatmal hospital sakal
विदर्भ

Accident News : करंजी-वणी मार्गावर वृत्तपत्राच्या वाहनाला ट्रकची धडक; चार ठार

...भीषण अपघातात कारचा पुढील भाग चेंदामेंदा होऊन तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

करंजी/पांढरकवडा : करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर कोठोडा येथे मंगळवारी (ता.११) पहाटे ६.१५ च्या सुमारास वणीकडून करंजीकडे येणाऱ्या ओमनी कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली.

यात कारचा चेंदामेंदा होऊन तीन जण जागीच ठार झाले तर एक जण उपचारादरम्यान यवतमाळ शासकीय रूग्णालयात दगावला. ही घटना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलावर घडली.

ही कार (क्र. एमएच३४ के१९५४) नागपूरवरून मराठी दैनिक वृत्तपत्राचे पार्सल घेऊन वणी-मारेगावहून पार्सल वाटप करीत करंजीकडे येत असताना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा येथील अरुंद पुलाजवळ अज्ञात ट्रकने कारला जबर धडक दिली.

या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चेंदामेंदा होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहून पळून गेला.

कारचालक किशोर बोरकर (रा. आनंद चौक, वरोरा, जि. चंद्रपूर), पुरुषोत्तम विठ्ठल नारायणे (वय५०, रा. इंद्रायणी नगर, वरोरा) रतन तुळशीराम खोडेकर (रा. डीगशे, ता. राळेगाव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

तर निकेश हसन आत्राम (वय१९, रा. चंदनखेडा, ता. भद्रावती) हा गंभीर जखमी. याला यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी व ट्रकची मदत घेण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेह पांढरकवडा येथे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास पांढरकवडा पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT