One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana esakal
विदर्भ

Ladki Bahin Yojana : बुलडाणा जिल्ह्यात एक लाख बहिणींनी भरले अर्ज

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. ज्या अंतर्गत महिलांना सरकार दरमहा १५०० देणार आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १० हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. यात ७० हजार ऑफलाईन, तर ४० हजार अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ४ लाख ९७ हजार ६५१ संभाव्य पात्र महिला आहेत.

अर्जदार महिला स्वत: मोबाईल ॲपवरून अर्ज सादर करू शकतील. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामध्येही विनामुल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

महिलांनी या सेवांचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. योजनेतून महिलांच्या थेट बँक खात्यात १ हजार ५०० रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये बँकेचा तपशील अचूक भरावयाचा आहे. तसेच अर्ज करण्याची सुविधा विनामुल्य असल्याने सुविधा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मेहकर आणि बुलडाण्यात सर्वाधिक अर्ज

बुलडाणा तालुक्यात ११ हजार २६४ महिलांना अर्ज भरले. तर चिखली तालुक्यात १० हजार ५१३, देऊळगाव राजा ११ हजार १३०, सिंदखेड राजा ६ हजार ३९ अर्ज, लोणार तालुक्यात ९ हजार ६५८, मेहकर १७ हजार १७० अर्ज, मोताळा तालुक्यात ६ हजार ६८४, मलकापूर ६ हजार ४०३ अर्ज, नांदुरा ६ हजार २३१ अर्ज, शेगाव तालुक्यात ३ हजार ८८९, खामगाव तालुक्यात ७ हजार ९३२, जळगाव जामोद ५ हजार ९५० अर्ज आणि संग्रामपूर तालुक्यात ७ हजार ९१६ महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT