online game task boy ended his life by jumping from the fourteenth floor Sakal
विदर्भ

Blue Whale Game : व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला अन्.. ऑनलाइन गेममुळे जीव देणाऱ्या मुलाच्या आईने सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : किवळे येथे सोळा वर्षीय मुलाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ऑनलाइन गेम खेळताना दिलेल्या टास्कमुळे त्याने उडी मारल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे.

आर्या उमेश श्रीराव (वय १६, रा. रुणाल गेटवे सोसायटी, किवळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो चिंचवड येथील एका खासगी शाळेत दहावीत शिकत होता. त्याचे वडील परदेशातील कंपनीत नोकरीला आहेत तर आई गृहिणी आहे.

त्याला एक लहान भाऊ आहे. आर्या गेल्या सहा महिन्यांपासून जास्त प्रमाणात ऑनलाइन गेम खेळत होता, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे.दरम्यान, २५ जुलैला पावसामुळे शाळांना सुटी होती. रात्री तो जेवणासाठी रूमच्या बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीत जाऊन बसला.

दरम्यान, दुसऱ्या मुलाला ताप असल्याने आई रात्री उशिरापर्यंत जागीच होती. त्याच वेळी ही घटना घडली. आर्याने त्याच्या वहीमध्ये काही मजकूर लिहिलेला आढळला आहे. दरम्यान, पोलिसांनी आर्याचा लॅपटॉप व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आईच्या पायाखालची जमीन सरकली

आर्या याची आई रात्री उशिरापर्यंत जागी होती. त्यावेळी सोसायटीच्या व्हाट्सअ‍ॅपवर ग्रुपवर एक मुलगा खाली पडल्याचा मेसेज आला. तो वाचताच आईने आर्यच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तो तिथे नव्हता.

आईने खाली जाऊन पाहिले असता, आर्य रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘‘पालकांच्या म्हणण्यानुसार, मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. त्यातून असा प्रकार घडला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सुरु आहे.

- महेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रावेत पोलिस ठाणे

‘‘हल्लीच्या मुलांमध्ये कुठेतरी संयम, जबाबदारी यांची कमी जाणवते. पालकांची भीती कमी झाली आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पाल्याशी मैत्री जरूर असावी. मात्र, शिस्त लावणे हेही पालकांचे काम आहे. कितीही व्यस्तता असली तरी आपल्या मुलांसाठी पालकांकडे वेळ असणे गरजेचे आहे.

- वंदना मांढरे, समुपदेशिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT