The orphan child is forced to look bad video Amravati crime news 
विदर्भ

पत्नीनेच केला पतीचा भंडाफोड : अनाथ मुलास वाईट दृश्‍य बघण्यास करायचा बाध्य

संतोष ताकपिरे

अमरावती : आई-वडील नसल्यामुळे इतरांच्या मदतीने राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन अनाथ मुलास एकाने वाईट दृश्‍य बघण्यासाठी बाध्य केले. ही खळबळजनक घटना खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत घडली. रविवारी संशयित आरोपीला सायंकाळी खोलापुरीगेट पोलिसांनी अटक केली. सोमवारी अटक संशयित आरोपीस न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे पोलिस निरीक्षक पंकज तामटे यांनी सांगितले.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचे पालनपोषण करणारे दुसरे कुणीच नसल्यामुळे विवाहित दाम्पत्याकडे तो राहत होता. सांगेल ते कामही करायचा. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्याचे काम घरातील पुरुषाने सुरू केले. सदर व्यक्ती हा पत्नीसोबत एकांतात असताना त्याठिकाणी अल्पवयीन अनाथ मुलास नेऊन नको त्या गोष्टी पाहण्यासाठी बाध्य करीत होता, असा आरोप खोलापुरीगेट ठाण्यात दाखल तक्रारीत संशयित आरोपीच्या पत्नीनेच केला.

अनाथ मुलाने ज्यांच्यावर विश्‍वास टाकला त्याच कुटुंबातील पुरुषाने असे चुकीचे कृत्य करण्यासाठी त्याला बाध्य केले, असा आरोप संशयित आरोपीच्या पत्नीने खोलापुरीगेट ठाण्यात दाखल तक्रारीत केला. पतीच्या कृत्याचा पत्नीनेच एकप्रकारे भंडाफोड केला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी संशयित आरोपीला सायंकाळी खोलापुरीगेट पोलिसांनी अटक केली. सोमवारी अटक संशयित आरोपीस न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे पोलिस निरीक्षक पंकज तामटे यांनी सांगितले. 

प्रेमसंबंध ठेवण्यासाठी युवतीला धमकी

एक अन्य घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ओळखीतील युवतीसोबत सतत मोबाईलवर संपर्क करून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी संशयित आरोपीने बाध्य केले. संबंध न ठेवल्यास मी काय करेल हे तुला माहिती आहे, आशी धमकी त्याने युवतीला दिली. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT