यवतमाळ : कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह (bodies) सोपविताना अदलाबदल झाल्याने संतप्त नातेवाइकांनी खासगी कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये तोडफोड (Demolition at Kovid Hospital Center) केली. रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्यादरम्यान शिंदे प्लॉटमध्ये ही घटना घडली. अवघ्या पंधरवड्यात डॉ. शाह हॉस्पिटलची दुसऱ्यांदा तोडफोड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ (Excitement in the medical field) उडाली आहे. (Outrage over change of bodies in Yavatma)
डॉ. शाह यांच्या रुग्णालयात दोन कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात यवतमाळ येथील प्रसिद्घ वकील अरुण गजभिये व आर्णी येथील पोलिस कर्मचारी शेळके यांचा समावेश आहे. ॲड. गजभिये यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांना मृतदेह अंत्यदर्शनासाठी दाखविण्यात आला. त्यानंतर वेष्टनात बंद केलेला एक मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला. स्वतः ऍम्ब्युलन्समधून मोक्षधामात मृतदेह नेल्यानंतर त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नातेवाइकांनी वेष्टण उघडून बघितले असता, आत दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले.
ॲड. गजभिये यांच्या नातेवाइकांनी मृतदेह मोक्षधामात तसाच सोडून रुग्णालय गाठले. झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत रुग्णालयात प्रचंड तोडफोड सुरू केली. डॉक्टरांचा कक्ष व रुग्णनोंदणी केंद्रासह रुग्ण भरती असलेल्या अतिदक्षता विभागातही नातेवाइकांनी तोडफोड केली. डॉक्टरांच्या वाहनांच्या काचादेखील फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
आमच्या नातेवाइकांचा मृतदेह परस्पर मोक्षधामात नेलाच कसा, असा जाब विचारण्यात आला. पोलिसांनी दोन्ही पक्षाची समजूत काढत पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी तक्रार दिली. गेल्या वर्षभरापासून सुरू झालेले डॉ. शाह यांचे कोविड हॉस्पिटल सातत्याने चर्चेत आले आहे. मार्च महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. तर पंधरवड्यापूर्वी एका महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.
या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा तोडफोडीची घटना घडली. मृतदेह बदलल्याने नातेवाइकांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डॉ. शाह यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
रुग्णांना भरली धडकी
डॉ. शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णही उपचारासाठी भरती आहेत. अतिदक्षता कक्षाची काच फोडल्याने आवाज ऐकून रुग्णांना धडकी भरली. तितक्याच ऑक्सिजन संपल्याची ओरड करीत नातेवाईकही बाहेर आलेत. मात्र, वेळीच पोलिसांनी घटनास्थळ गाठल्याने पुढील अनर्थ टळला.
(Outrage over change of bodies in Yavatma)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.