चंद्रपूर: ब्रह्मपुरी येथील कॉंग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरातून शंभरपेटी दारूसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईने खळबळ उडाली आहे. मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली. मागील सहा वर्षांत दारूतस्करांवर अनेक कारवाया जिल्हा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने केल्या. मात्र, पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेरील यंत्रणेने दारुविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस आणि राजकीय आशीर्वादाने दारूविक्री सुरू आहे. दारूतस्करांना क्षेत्र वाटून देण्यात आले. एकमेकांच्या क्षेत्रात घुसखोरी करायची नाही, असे निर्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यात दारूविक्री आणि तस्करी सुरू आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा, त्यांच्याच मतदारसंघातील नगरसेवक दारूतस्करीत सापडला. भुर्रे मागील अनेक महिन्यांपासून खुलेआम दारूविक्री करायचा. मात्र, राजकीय दबावामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील विशेष पथकाकडे याची तक्रार करण्यात आली. आज गुरवारला रात्री 12 वाजताच्या सुमाराला या विशेष पथकाने भुर्रे याच्या घरावर छापा टाकला आणि दारूसाठा जप्त केला. कारवाईच्या वेळी भुर्रे घरी उपस्थित नव्हता. त्याला अद्याप अटक झाली नाही.
हेही वाचा - गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचाच 'अपघात',...
या कारवाईने राजकीय आशीर्वादाने दारूविक्री करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे दारूतस्करांना जिल्हा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे पाठबळ आहे. त्यामुळे दारूतस्करांवर कारवाई होत नाही. त्यामुळे बाहेरच्या यंत्रणेवर विश्वास ठेवावा लागतो, असे या निमित्ताने समोर आले.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.