Patients including doctors from Melghat's Bharari squad are in danger 
विदर्भ

मेळघाटच्या भरारी पथकातील डॉक्‍टरांसह रुग्णांचा जीव धोक्‍यात; खिळखिळ्या वाहनाचा होतोय उपयोग

राज इंगळे

अचलपूर (अमरावती) : मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडे तत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडे तत्त्वावर घेतलेले वाहने मागील तीन-चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे. त्यातील बहुतांश वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णासह डॉक्‍टरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रुग्णांची तथा डॉक्‍टरांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेळघाटातील दुर्गम भागात जेथे उपचार करण्यासाठी व दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणच्या गर्भवतींना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक जिकिरीचे होते. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने २५ जून १९९५ ला नवसंजीवनी योजनेअंतर्गत भरारी पथकाची स्थपना केली होती. त्या योजनेअंतर्गत डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच त्याच्यासाठी खासगी भाडे तत्त्वावर वाहनांची सोय उपलब्ध करून दिली होती. यामध्ये जवळपास मेळघाटात २२ डॉक्‍टरांसाठी २२ खासगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

वाहनांसाठी नियमाप्रमाणे दरवर्षी टेंडर प्रक्रिया राबवावी लागते. टेंडर प्रक्रिया सुरळीत चालू होती. मात्र, तीन-चार वर्षांपासून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने २०१० वर्षांपूर्वीचेच वाहने डॉक्‍टरांच्या दमतीला आहेत. यातील बहुतेक वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांचा जीव धोक्‍यात आला आहे. एखाद्या वेळेस काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष दिल्यास होणाऱ्या अनुचित घटनेला पायबंद बसू शकतो. अन्यथा या खिळखिळ्या वाहनांमुळे एखादी मोठी घटना घडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन दहा वर्षे जुने झालेले वाहने बंद करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले
मेळघाटात अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २२ भरारी पथकातील डॉक्‍टरांसाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली नाही. आता मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच वाहने भाड्याने घेण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशाने दिले आहेत.
- सुभाष पाटील,
वरिष्ठ सहायक, वाहन शाखा, जि. प. अमरावती

चौकशी करण्यात येईल
मेळघाटातील आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित वाहने मिळावीत यासाठी यावर्षीपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थानिक स्तरावर टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, टेंडर प्रक्रिया का राबविण्यात आली नाही याची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT