विदर्भ

...तर आरोग्य केंद्र बंद पाडू; ऑनलाइन लसीकरण पद्धतीविरोधात तरुणाईचा संताप

सकाळ वृत्तसेवा

कोकार्डा (जि. अमरावती) : 18 ते 44 वयोगटातील 100 कोरोना लसीचे (Corona Vaccine) ऑनलाइन प्रयोजन होते. मात्र बाहेर गावावरून जी ऑनलाइन नोंदणी (Online Registration) झाली, ती मंडळी लस घेऊन निघून गेली आणि स्थानिक तरुण मात्र पाहतच राहिले. त्यामुळे कोकर्डा येथील तरुणांनी संताप व्यक्त केला. (people angry on Online vaccination system in Korkardi Amravati)

अचलपूर, पथ्रोट, वर्धा, अंजनगाव येथील व्यक्तींनी येथील लसीकरण केंद्रात आपले लसीकरण करून घेतले. त्यांची संख्या 70 होती. याबाबत स्थानिक तरुण वर्ग खूप चिडला असून सदरची ऑनलाइन पद्धत ही सदोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारण कोकार्डा परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील एकाही व्यक्तीला लसीकरण झाले नाही. या पद्धतीमध्ये लवकर सुधारणा करावी किंवा 50 टक्‍के ऑनलाइन आणि 50 टक्‍के खुल्या पद्धतीने नियोजन करावे अशी मागणी या युवकांनी केली. याबाबतीत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर त्वरित निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आरोग्य केंद्र बंद पाडू असा निर्वाणीचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

स्थानिक ग्रामस्थांना प्रथम प्राधान्य द्यावे असेही ते म्हणाले. आरोग्य ऍप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करून ते पाहणे आणि इतरांना सांगणे हे जिकरीचे काम आहे. अजूनही ग्रामीणमध्ये स्मार्टफोनचा सर्वसामान्य उपयोग झाला नसून त्यामुळे ही प्रकिया जटिल वाटते. 7 मे ला 18 ते 44 वयोगटातील हा पाहिलाच डोस होता. मात्र स्थानिकांच्या हक्काचा पहिला डोस ऑनलाइन प्रक्रियेमुळे बाहेरगावचे लोक घेऊन गेले. त्यामुळे कोकरड्यातील तरुणवर्ग चिडला. अशीच जर प्रकिया असली तर आम्ही डोस घ्यायचा तर कधी? असा प्रश्न यावेळी त्यांनी केला.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात समस्या मांडताना सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंजरकर, शिवसेना तालुका उपप्रमुख निवृत्ती बारब्दे, शेषराव गव्हाळे, उमेश टोलमारे, पंकज पिंजरकर, वैभव मिसाळ आणि उद्धव बारब्दे सहित अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

लसीकरण नियमानुसारच

सदरच्या ऑनलाइन लसीकरण पद्धतीमध्ये आम्ही काहीही फेरबदल करू शकत नाही. ज्या पद्धतीने आम्हास आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करावी लागते. आज 100 लसीचे लक्ष होते. मात्र ते ऑनलाइन वाल्यांसाठीच होते. त्यामुळे आम्ही खुल्या पद्धतीने ते ग्रामस्थांना देऊ शकलो नाही. ज्यांनी ऑनलाइन केले, त्यांचेच आम्ही लसीकरण केले. मग ते कुठलेही असोत, असे येथील डॉ. खोरगडे यांनी सांगितले.

(people angry on Online vaccination system in Korkardi Amravati)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT