Sindikar came together on Railway service issue Nitin Gadkari Devendra Fadnavis wardha sakal
विदर्भ

पुरे झाले, आता रेलरोकोच! स्वयंस्फूर्तीने सिंदीकर आले एकत्र

सिंदीकरांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सभा घेत रेल्वे रोको चा निर्णय घेतला

मोहन सुरकार

सिंदी : कोरोना काळात केंद्र सरकारने रेल्वे सेवा तात्पुरती बंद केली होती. आता परिस्थिती बदलली असताना अद्याप सिंदीत रेल्वेचे थांबे पूर्वत झाले नाही. यामुळे येथील नागरिकांन रेल्वेमंत्र्यांपर्यंत निवेदने दिली. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नसल्याने अखेर सिंदीकरांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सभा घेत रेल्वे रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रविवारी (ता. १७) हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

रेल्वे सेवा सुरळीत होण्याकरिता शहरातील सर्वपक्षीय लोकांनी परिवहनमंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्र्यांपासून डीआरएम नागपूरपर्यत सर्वाचे उंबरठे झिझविले. मात्र, या सर्वानी सिंदीवासीयांच्या या मागणीला दुर्लक्षीत केले. केवळ वेळकाढु धोरनाचा अवलंब करीत रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी तारखेवर तारखा देण्यात आल्या.

या सर्व प्रकाराने सिंदी तसेच परिसरातील लगतच्या गावखेड्यातील प्रवास करणारी जनता वैतागली आहे. ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी शनिवारी (ता.नऊ) आम सिंदीकरानी जनआंदोलन निर्धारीत करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे बाजारातील गांधी चौकात आयोजन केले होते. कोणतेही नेतृत्व नसताना बैठकीला ५०० हुन अधिक लोकांनी हजेरी लावत मनातील खदखद व्यक्त केली. यात सर्व सामान्य नागरिकांसोबत महिलासुध्दा उपस्थिती होत्या. यावेळी अनेकांनी रेल्वे बंदमुळे आपली कशी फजिती होत आहे आणि आर्थिक परिस्थिती कोलमडून गेल्याबद्दल कैफियत मांडली.

यावेळी प्रहारचे गजानन कुबडे, जयंत तिजारे, भाजपचे ओमप्रकाश राठी, वेगळा विदर्भ सघटनेचे रामकिशोर सिंगनधुपे, शेतकरी संघटनेचे निळकंठ घवघवे, शिवसेनेचे मुन्नाजी शुक्ला, सरपंच संघटनेचे धीरज लेंडे, अॅड. पंकज झाडे, डॉ. संदीप खेडकर, डॉ. राहुल लोडे, राष्ट्रवादीचे सुधाकर खेडकर, प्रवासी मित्र मंडळाचे अध्यक्ष गुल्लू भन्साली, राजु भगत, रूपाली कांबळे, पचारे आदींनी उपस्थितांना संबोधित केले. सोबतच आंदोलनाची दिशा आणि नियोजनाबाबत विचार मांडुन चर्चा केली.

आंदोलनाला लोकप्रतिनिधींचेही सहकार्य

सिंदीकराच्या खांद्याला खांदा लावून या आंदोवनात साथ देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले. यात खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे, शिवसेना नेते डॉ. उमेश तुळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन कुबडे, जयंत तिजारे, वेगळा विदर्भ राज्य आघाडी नेते रामकिशोर सिंगनधुपे यांनी आंदोलनात सहभागी होणार असलल्याचे कळविले आहे.

रेल्वे जनसंपर्क अधिकारी रात्री पोहचले बैठकस्थळी

रेल्वे प्रशासनाला आंदोलनाची कुणकुण लागताच रात्री ९ वाजता रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी पाटील आणि सहकारी दाखल झाले. शहरातील बैठकस्थळी त्यांनी उपस्थिती आंदोलनकारी यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने त्यांना ठणकावून सांगत आता पुरे झाले तुमचे आश्वासन. हे आंदोलन थांबवायचे असेल तर १७ तारखेपुर्वी ८० टक्के थांबे पुर्वत सुरू करा अन्यथा येणाऱ्या स्थितीला सामोरे जा, असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT