Political parties are active for Gram Panchayat Elections in Gadchiroli  
विदर्भ

महाविकास आघाडीत बिघाडी अन् भाजपची पिछाडी; स्थानिक पातळीवरील घडामोडींवर राजकीय पक्षांचे लक्ष

संतोष मद्दीवार

अहेरी (जि. गडचिरोली) : ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार पक्‍के झाले असून त्यांना निवडणूक चिन्हही मिळाले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. तशी ही निवडणूक स्थानिक पातळीच्या मुद्यांवर लढली जात असली, तरी मोठ्या राजकीय पक्षांचेही या निवडणुकीतील घडामोडींवर लक्ष आहे. पण, या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत बिघाडी दिसत असून भारतीय जनता पक्षही पिछाडीवरच असल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांमध्ये रस्सीखेच असली तरी आजकाल राजकीय पक्षांचाच प्रभाव अधिक दिसतो. निवडणुकीसाठी वाढलेला खर्च परवडेनासा होत असल्याने उमेदवार राजकीय पक्षांची मदत घेताना दिसतात. पर्यायाने राज्यस्तरावरील राजकारणाचा प्रभाव ग्रामपंचायत स्तरावरही दिसतो. त्यानुरूप गावपातळीवरही युती-आघाडी होते. अहेरी उपविभागात मात्र महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसते. पराकोटीला पोहोचलेल्या द्वेषामुळे महाआघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी एकमेकांना पाण्यातच पाहताना आढळतात. 

ग्रामपंचायत निवडणुकीत घटक पक्षांनी आपापली मोट वेगळी बांधून घेतली आहे. त्यातल्या त्यात आदिवासी विद्यार्थी संघ आणि कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही काही ठिकाणी धुसफूस पाहायला मिळत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनासुद्धा शड्डू ठोकणार असल्याची चर्चा आहे. नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व दाखवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना पदाधिकारी सक्रिय होताना दिसत आहेत. 

भाजपकडे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसताना दिसत आहे. मुळातच ग्रामीण भागात फारसा प्रभाव नसलेला भाजप निवडणुकीच्या आधीच माघारलेला दिसत आहे. मात्र आगामी नगरपंचायत निवडणुका भाजप प्रतिष्ठेची करणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या तरी कोणत्याही पक्षाचा मोठा नेता या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रकर्षाने सक्रिय होताना दिसून येत नसला, तरी पडद्यामागून राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील आमदारांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रोत्साहन निधी देण्याचे आश्‍वासन देत या निवडणुकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्यातूनच अनेक पक्ष आपल्या प्रभावातील अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करून आपल्या खिशात घालण्यासाठी धडपडत आहेत. एकीकडे आम्ही या खेळात नाहीच असे वरवर भासवत दुसरीकडे अधिकाधिक ग्रामपंचायतींवर आपलाच झेंडा रोवायचा किंवा निवडणूक झाल्यावर विजेत्यांना आपल्या गोटात घेऊन त्यांच्या हातात आपला झेंडा द्यायचा, असे प्रयत्न सुरू आहेत.

रंगीत तालीम

सध्या ग्रामपंचायत निवडणूक असली, तरी त्यानंतर लवकरच नगरपंचायतीच्या निवडणुकाही आहेत. त्यामुळे अहेरीतील राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक रंगीत तालिम ठरणार आहे. नगरपंचायतीची निवडणूक शहरी भागात होत असली, तरी एकदा "इलेक्‍शन मोड' मध्ये आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते अधिक जोमाने कार्य करतात. शिवाय नियोजन, रणनीती, जनसंपर्क, संघटन मजबूती, मोर्चेबांधणी याचाही सराव होत असल्याने यादृष्टीनेही ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT