पथ्रोट (जि. अमरावती) : कोरोनाने (coronavirus) अनेक व्यवसाय मोडकळीस आले असून काहींनी व्यापक बदल करून आपले आर्थिक गणित सांभाळले आहे. अशातच पथ्रोट (pathrot amravati) येथील एका व्यावसायिकाने पंक्चर दुरुस्तीच्या (puncture repairing) पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नवा ट्रेंड सुरू केला आहे. एका कॉलवर पंक्चरची दुरुस्ती किंवा हवा दिली जात असल्याने अडचणीच्या काळातसुद्धा त्यांनी चांगला मार्ग शोधून काढला आहे. जावेद खान, असे या व्यावसायिकाचे नाव. (puncture repair on one call in pathrot of amravati)
जावेद खान यांचे पथ्रोटच्या आठवडी बाजाराच्या समोर वडिलोपार्जित पंक्चर दुरुस्ती व हवा भरण्याचे छोटेखानी दुकान आहे. आजोबा व वडिलांच्या निधनानंतर आपले पारंपरिक काम जोपासत असताना कोरोनाच्या काळात सर्वदूर लॉकडाउन सुरू झाल्यावर पंक्चर दुरुस्ती व हवा भरण्याचे दुकानही बंद पडले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कधी लॉकडाउन, तर कधी अनलॉकच्या फेऱ्यात अडकल्याने व्यवसाय स्थिरावत नव्हता.
अत्यावश्यक सेवेकरिता धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची पंक्चर दुरुस्ती व हवा भरण्याची मागणी असतानाही काही अंशी त्यांना सेवा देताना इतर खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी असल्याने व्यवसाय पूर्णतः बंद पडला होता. परिणामी दैनंदिन व्यवहाराकरिता लागणारा आर्थिक प्रश्न उभा राहिला. अशातच पुन्हा अनलॉक झाले. त्यामुळे आहे त्याठिकाणी दुकान थाटण्यात आले. परंतु आधीच्या व्यवसायात व आताच्या व्यवसायात कमालीचे अंतर पडल्याने या व्यवसायातून अत्यंत कमी आवक मिळत आहे. मात्र, खचून न जाता जावेद याने यासर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन एका हातगाडीवर पंक्चर दुरुस्ती व हवा भरणारी मशीन, असे साहित्य लावून मोबाईल पंक्चर दुकान तयार केले. आता ती हातगाडी जावेद सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात, राज्य महामार्गावर फिरवून लोकांच्या मागणीनुसार बोलावलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना पंक्चर दुरुस्ती व हवा भरण्याची सेवा देत आहे.
कोरोना काळात लॉकडाउन लागल्याने सर्वदूर प्रत्येक आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी ऑनलाइन सेवेला प्राधान्य देण्यात आले. याचा अंदाज घेऊन मीसुद्धा पंक्चर दुरुस्ती व हवा भरण्याचे फिरते दुकान हातगाडीवर तयार केले. ज्यामुळे ग्राहकांना हव्या त्याठिकाणी वेळेवर सुविधाही मिळत आहे.- जावेद खान, पथ्रोट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.