Ramtek Loksabha Election sakal
विदर्भ

Ramtek Loksabha Election : शिवसेना आणि काँग्रेससाठी अस्मितेचा मुद्दा! मतविभाजनाचे अंदाज फोल ठरल्याने निकालाची उत्सुकता

अनिल यादव

रामटेक - १९५७ मध्ये अमरावती पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ विसर्जित करून रामटेकची निर्मिती झाली. १९५७ ते १९९८ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, १९९९ ते २०१९ या वीस वर्षांच्या काळात शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे.

यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा थेट सामना काँग्रेससोबत होत आहे. रामटेकमधील काटोल, सावनेर आणि उमरेड मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढला असून इतिहासावर नजर टाकली असता याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे दिसून आले.

रामटेकमध्ये काटोल, सावनेर, उमरेड, रामटेक, हिंगणा आणि कामठी, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये काटोल, सावनेर, उमरेड या मतदारसंघामध्ये बंपर मतदान झाले होते. या तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर कामठी, हिंगणा आणि रामटेकमध्ये ६० टक्‍क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. रामटेकमध्ये अपक्ष तर कामठी, हिंगण्यात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.

२०२४ मध्येही अशीच परिस्थिती आहे. शिवसेनेसाठी ही निवडणूक अस्मितेचा मुद्दा झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सातत्याने जिंकत आली. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर पक्षाची इभ्रत वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार शामकुमार बर्वे यांना जातप्रमाणपत्राचा उभा ठाकल्याने मैदानात उतरविण्यात आले. बर्वेंसाठी काँग्रेस नेत्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले.

१२ टक्क्यांचा खेळ

रामटेकमध्ये एससी मतदारांची संख्या १२ टक्क्यांच्या आसपास आहे. २०१९ मध्ये धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मतविभाजन झाले होते. यावेळी मात्र, यातील बहुतांश मते महाविकास आघाडीकडे गेल्याची चर्चा आहे. त्यातच काँग्रेसचे नेते सुनील केदार, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) स्थानिक नेत्यांनी आपआपली मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात यश प्राप्त केले आहे.

आयात उमेदवाराचा फायदा की तोटा?

रामटेकची जागा मिळावी, यासाठी भाजपने शेवटपर्यंत जोर लावला पण मुख्यमंत्री शिंदे यांनी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करीत हा मतदारसंघ खेचून आणला. रामटेक तर मिळाले पण गड लढवायला सक्षम उमेदवार न मिळाल्याने उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंना शिवसेनेत आणून उमेदवारी दिली. जातप्रमाणपत्राच्या मुद्यावरून काँग्रेसचेही हसेच झाले. त्यामुळे राजू पारवे यांच्या रूपाने खेळलेली राजकीय खेळी उलटणार तर नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चार रणरागिणींचा चौफेर प्रचार

रामटेक लोकसभा मतदारसंघाला काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्यांनी जणू वाऱ्यावर सोडले, असे म्हणावे लागले. कारण, एकही मोठा नेता प्रचारासाठी आला नाही. असे असतानाही महाविकास आघाडीच्या बाजूने माहोल तयार करण्याचे काम काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केले.

त्यात सर्वात मोठा सहभाग हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा होता. या चौघींनी अत्यंत सुनियोजितपणे आणि फारसा गाजावाजा न करता रामटेक मतदारसंघ पिंजून काढत मतदारांपर्यंत पोहचल्या.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • शिवसेना फुटली तरी कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी

  • मुस्लिम, बौद्ध बांधवांचा शिवसेनेविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’

  • रामटेक एससीसाठी राखीव पण बौद्ध उमेदवाराला उमेदवारी नाही

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसतानाही महायुती सरकारने केली अटक

  • कृपाल तुमाने यांचे तिकीट कापल्याने नाराज

समर्थक मनापासून महायुतीच्या पाठीशी होते काय?

  • कापूस,सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

  • वर्षभरात तीनदा आलेल्या अवकाळीने पिकाचे झालेल्या नुकसानीची न मिळालेली भरपाई

  • आश्वासन देऊनही गेल्या दहा वर्षात अपूर्ण असलेला गोसेखूर्द प्रकल्प

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्हान येथे झालेली सभा

  • काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT