ravi rana allegation on bacchu kadu make sure defeat of navneet rana in lok sabha election 2024  Sakal
विदर्भ

Ravi Rana : बच्चू कडू यांनी घेतली होती नवनीत राणांना पाडण्याची सुपारी; राणा व कडू वाद पुन्हा पेटणार?

अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आमदार राणा यांनी प्रथमच आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली.

सकाळ वृत्तसेवा

Amravati News : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नवनीत राणा यांच्या पराभवासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी सुपारी घेतली होती, असा आरोप आज आमदार रवी राणा यांनी केला. त्यामुळे आमदार राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद परत एकदा पेटण्याचे संकेत आहेत.

प्रहारचा उमेदवार रिंगणातून मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्याशी सुद्धा डील करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना कुठून रसद मिळाली, याचे सर्व पुरावे आपल्याजवळ असून योग्य वेळ आल्यावर ते आपण जनतेसमोर मांडू.

तसेच विकासाला अडसर ठरलेल्यांना जनताच विधानसभा निवडणुकीत आपली जागा दाखवेल, असे आमदार रवी राणा म्हणाले. अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आमदार राणा यांनी प्रथमच आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली.

राणा म्हणाले, नवनीत राणा यांच्या पराभवासाठी सारेच विरोधक सरसावले होते. खोडके दाम्पत्याने महायुती किंवा महाविकास आघाडीचा धर्म न पाळता विरोधात काम करून आपली पोळी शेकून घेतली.

नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकाळात अमरावीतचे प्रश्न देशपातळीवर नेले होते. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने संसदेत संघर्ष केला. मात्र त्यांच्या पराभवामुळे जिल्हा विकासाच्या बाबतीत २० वर्षे मागे गेला आहे. असे असले तरी या लढाईत सिकंदर ठरलेले बळवंत वानखडे हे आता जिल्ह्याचे खासदार बनले असून त्यांना गरज वाटल्यास आपण नेहमीच सहकार्य करू, असेही ते म्हणाले.

अमरावती जिल्ह्यात कधी नव्हे एवढी विकासकामे नवनीत राणांच्या कार्यकाळात झाली. बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क, पर्यटनाला चालना देणारा चिखलदरा येथील प्रस्तावित स्कायवॅाक यासह अनेक विकासकामे अमरावतीत केल्यानंतरही नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला, हे आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे आमदार राणा यावेळी म्हणाले.

भाजप नेत्यांबाबत नो कॉमेन्टस

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांचे काम केले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महायुतीच्या सर्व नेत्यांचे आम्ही आभारी आहोत. कुणी काम केले किंवा नाही केले, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असून तेच याबाबतीत काय तो निर्णय घेतील, असेही राणा म्हणाले.

विजयाचे श्रेय काँग्रेस नेत्यांना

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयात आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाशी इमानेइतबारे काम केल्याने काँग्रेसला विजय मिळाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

रवी राणा यांनी केलेल्या प्रत्येक आरोपावर आम्ही न्यायालयात दावा दाखल करू. रवी राणा यांनी वेळोवेळी इतरांवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा (वाचाळपणा) फटका नवनीत राणा यांना बसला. त्यांच्या करणीमुळे ते पडले. मात्र खापर आमच्यावर फोडले जात आहे. त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसून विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्ही आमचे उत्तर देऊ.

-बच्चू कडू, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT