Navneet Rana, Ravi Rana News Navneet Rana, Ravi Rana News
विदर्भ

Ravi Rana: बडनेरातून रवी राणांना पाठिंबाही नको अन् उमेदवारीही! भाजप नेत्यांचा विरोध

Amit Ujagare (अमित उजागरे)

अमरावती : बडनेरातून रवी राणांना भाजपची उमेदवारी नको अशी भूमिका आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. रवी राणा यांना उमेदवारी न देता भाजपच्या निष्ठावंताना उमेदवारी द्या, अशी मागणी भाजपचे महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी केली आहे. (Ravi Rana should not give support or candidacy from Badnera by BJP says BJP leaders)

आमदार रवी राणा यांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपची काल बैठक पार पडली. यावेळी आमदार रवी राणा यांना भाजपनं समर्थन किंवा उमेदवारी देऊ नये अशी मागणी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी केली. तसा ठराव या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठांना पाठवला आहे. यावर अमरावती जिल्हा भाजपचे महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी भाष्य केलं आहे.

शेगोकार यांनी म्हटलं की, "नवनीत राणा दोन टर्म खासदारकीसाठी उभ्या होत्या तेव्हा त्यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून कमी लीड होतं. मात्र, यावेळी मात्र भाजपकडून त्या उभ्या होत्या तर त्यांना बडनेरातून 24 हजारांची लीड मिळाली. त्यामुळं आता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की पक्षानं रवी राणा यांना बडनेरातून उमेदवारी न देता भाजपच्या निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी, त्या उमेदवाराला आम्ही प्रचंड बहुमतानं निवडून आणू"

मागच्यावेळी आयत्यावेळी कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. पण आता विधानसभेला बराच वेळ आहे, त्यामुळं आत्ताच आम्ही पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगू आणि त्याप्रमाणं काम करु, असंही यावेळी प्रशांत शेगोकार यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT