khir kanole 
विदर्भ

वैदर्भीय पाककृती : जाणून घ्या कसे करायचे खीर कानवले

स्वाती हुद्दार

प्रत्येक प्रांताची खाद्य परंपरा असते. त्या-त्या प्रांताचे हवामान, तिथली जमीन, तिथली पिके यावरच तिथली खाद्यसंस्कृती रुजते, वाढते. भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची मोठी परंपरा आहे. आणि हे सण कृषी परंपरेवर आधारलेले आहेत. सगळे सण पिक हंगामाभोवती गुंफलेले आहेत. पावसाळा शेतकऱ्यांसाठी खूप गडबडीचा. पेरण्या आटोपल्या की शेतकऱ्यांना थोडी उसंत मिळते. तोपर्यंत गणपतीची धामधुमही आटोपलेली असते. पावसानेही उसंत घेतलेली असते आणि मग येतो पितृ पंधरवडा. पितरांच्या स्मरणाचा काळ.
विदर्भातला हा मोठा सण. या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते. यावेळी पानावर वाढण्यासाठी विशेष पदार्थ केले जातात. त्यातील एक म्हणजे खीर-कानवले.
जाणून घेऊया या पदार्थांची रेसिपी

तांदळाची खीर
साहित्य 
सुगंधी तांदुळ अर्धी वाटी, दूध तीन वाटी, सुकामेवा (काजू – बदाम – पिस्ता काप) दोन चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, साखर एक वाटी.

कृती 
प्रथम तांदुळ चांगल्या तुपावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. गार झाले की मिक्सरवर वाटून घ्यावेवाचलेला तांदळाचा रवा गरम पाणी घालून शिजवून घ्यावा. पातेल्यात दूध उकळत ठेवावे. थोडे आटल्यावर त्यात सुकामेवा साखर घालून उकळावे. नंतर त्यात शिजवलेला तांदळाचा रवा घालावा. वेलची घालून हलवून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.

कानवले

साहित्य 
दोन वाटी कणीक, दोन चमचे तेल, मीठ.

कृती 
कणीक एक चमचा तेल व चिमूटभर मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. दहा मिनिटे ओल्या फडक्याने झाकून ठेवावी. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यावी. त्याला तेल लावून चौपदरी घडी घालून ठेवावी. अशा सर्व पोळ्या लाटाव्या. नंतर एका मोठ्या गंजात पाणी उकळून घ्यावे. त्यावर स्टीलची चाळणी ठेवावी. त्यावर लाटलेले कान्होले ठेऊन चांगली वाफ काढावी. हे कानवले गरम किंवा गार खिरीसोबत वाढावे. खीर- कानवले खूप छान लागतात.


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : थंडीत घट..! नाशिकचे किमान तापमान पोहोचले 17.7 अंशांवर

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT