विदर्भ

संचारबंदीत रस्त्यावर आरटीपीसीआर चाचणी; अमरावती महापालिकेचा उपक्रम

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे शासनाने आठवडाभराची संचारबंदी (Amravati Lockdown) लागू केली. परंतु संचारबंदी काळातही महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (Health department) पथकाने रहदारीच्या रस्त्यांवर व मुख्य चौकात पुन्हा कोरोनाचे (आरटीपीसीआर) (RT-PCR) लक्षण तपासण्यासाठी चाचणी सुरूच ठेवली. (RTPCR testing of people on road in Amravati)

सोमवारी दुपारी दहा ते पंधरा जणांचे महापालिकेचे पथक काही तास थांबले. ज्यांना आरटीपीसीआर चाचणी करावयाची आहे, त्यांच्याकरिता आरोग्य विभागाने नि:शुल्क व्यवस्था केली आहे. शिवाय संचारबंदी काळात ज्याप्रमाणे अत्यावश्‍यक सेवेत असलेली मंडळी दिसतात, त्याचप्रमाणे काही कारण नसताना फिरणारे लोकही आहेत.

अशांसाठी ही आरटीपीसीआर चाचणी केल्या गेली. महापालिकेच्या पथकाने ध्वनिक्षेपकावर ज्यांना चाचण कराची आहे, त्यांनी महापालिकेच्या वाहनाजवळ यावे, असे आवाहन केले. तपासणीनंतर काही मिनिटांतच जागेवर संबंधितांना त्याचा अहवाल दिल्या जात होता. एका व्यक्तीला तपासणीसाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी लागतो.

राजकमल चौकानंतर दुसरीकडेही या पथकाने अशी चाचणी केली होती. अनावश्‍यक फिरणाऱ्यांपैकी काहींना पकडून त्यांचीही आरटीपीसीआर चाचणी केली. त्यापैकी पॉझिटिव्ह आढळलेल्यांची क्वारंटाइन सेंटरमध्ये रवानगी केली.

(RTPCR testing of people on road in Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT