SDO office give corona survey to dead teacher in yavatmal 
विदर्भ

आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नियंत्रणासाठी आपातकालीन उपाययोजना करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांचे चौदा दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षिकेलाही सर्वेक्षणाचे आदेश देण्याचा धक्कादायक प्रकार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे 'वाह रे' प्रशासन...म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कुटुंबंच्या कुटुंब बाधित होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अधिक संख्येने बाधित झालेले रुग्ण ज्या परिसरत आढळत आहेत, तो परिसर हॉटस्पॉट व प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांचे चौदा दिवस सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. या संपूर्ण कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने एकूण 164 शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची यादी बनवली आहे. यात शंभरपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचीच नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, 98 क्रमांकावर नाव असलेल्या शिक्षिकेचा पंधरा दिवसांपूर्वीच कोविडने मृत्यू झाला आहे. त्यांचे कुटुंबीय या धक्‍क्‍यातून अजूनही सावरले नाहीत. तोच प्रशासनाने सर्वेक्षण कामाच्या यादीत नाव टाकून मानसिक धक्का दिला आहे. सर्वाधिक चिंता व संदेशनशीलतेचा काळ हा कोरोनाचा आहे. प्रशासन एकदिलाने काम करीत असल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. प्रत्यक्षात समन्वयाचा ताळमेळ कुठेही दिसत नाही. त्यामुळेच कोविडमुळे मृत झालेल्या शिक्षिकेवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली आहे. या कारभारामुळे कर्मचारी वर्गातून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. 

काय आहे जबाबदारी -
प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे दैनिक आरोग्य सर्वेक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे, को-मॉर्बिड व 60 वर्षांवरील सर्व नागरिकांची यादी तयार करणे, एसपी ओटू व शरीराच्या तापमानाच्या नोंदी घेणे, आयएलआय, सारी आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती नोडल अधिकाऱ्यांना देणे, नागरिकांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगणे, लसीकरण केंद्रावर काम करावे लागल्यास कोवीड प्रोटोकॉलप्रमाणे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे, समूपदेशन आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे.

मृत शिक्षिकेच्या कुटुंबावर आघात झाला. त्यांच्या दु:खात सहभागी न होता जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे. ज्या कर्मचाऱ्याने सदर आदेशाची यादी तयार केली, त्याचे निलंबन करून खाते चौकशी करण्यात यावी. तसेच यादीवर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. 
-साहेबराव पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती, यवतमाळ.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT