Shed collapsed on pyre itself during Cremation in Jamshedpur 
विदर्भ

जगण्याने छळले होते, आता मरणानेही छळले!

जमशेदपूर येथे अंत्यसंस्कारादरम्यान चितेवरच नवीन बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे शेड कोसळले

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) - इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते! सुरेश भटांची ही गझल सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. मात्र, सद्यःस्थितीत पंचायत राजमधील विकासकामात बोकाळलेली भ्रष्टाचारी वृत्ती कविकल्पनेच्या पलीकडे गेली आहे. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ हा भारतीय संस्कृतीत संकेत असताना मरणानंतरही छळ होतो, हे आता स्पष्ट झाले आहे.

जमशेदपूर येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान जळत्या चितेवरच नवीन बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे शेड कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत टाहो फोडत होता. हा प्रकार म्हणजे जीवनाने तर छळलेच, आता तर मरणानेही छळले… असेच म्हणावे लागेल. बरे, याच प्रकारची दुर्घटना यापूर्वी निंबी स्मशानभूमीत काही महिन्यांपूर्वी घडली. वसंतनगरमध्येही हाच कित्ता घडला आहे. या गंभीर प्रकाराची पंचायत प्रशासनाकडे रीतसर तक्रार करण्यात आली. या गैरप्रकारातील अपराध्यांना मात्र शासनाने मुळीच छळले नाही. त्यामुळे विकासकामातील भ्रष्टाचाराचे वाटेकरी असलेल्या सर्वांचेच उखळ पांढरे झाले, अशी शंका घेण्यास मोठा वाव आहे.

अधिकारी, पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, कर्मचारी, अभियंते, कंत्राटदार ही कमिशनखोरी व भ्रष्टाचारी विचाराची साखळी अतिशय चलाखीने जोपासत असल्याने विकासकामांच्या गुणवत्तेबद्दल उगीचच कुणीही ‘ब्र’ शब्द काढू नये, अशीच सद्यःस्थिती आहे. विकासकामांच्या गुणवत्तांची तपासणी करणारी यंत्रणाही भ्रष्टाचाराने बरबटली असावी, अशी शंका आहे. त्यामुळे दर्जाहीन काम करणाऱ्‍या कंत्राटदारांची मुजोरी वाढली आहे.

या मनमानी कारभाराला आवर घालण्याची ताकद संबंधित अधिकाऱ्‍यांमध्येही नाही. याचे उत्तम उदाहरण फुना ते बाना या रस्ता बांधकामाचे देता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचा रखडलेला हा रहदारीचा रस्ता कशाचे द्योतक आहे? न्याय मागवा कुणाकडे? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांवर ‘नकोत ती विकासकामे, राहू तरीही भकासवाणे’, अशी दर्दभरी गझल गाण्याची वेळ आली आहे. जळत्या चितेवर सिमेंटची स्लॅब कोसळली तर काही काळ ओरड होते. नंतर हा प्रश्नच संपूर्ण जळालेल्या चितेसारखा थंड राख बनतो. नावालाच उरलेली पंचायतराज व्यवस्था व गुणवत्ता तपासणी विभागाने विश्वासार्हता गमावली आहे.

कारवाईचा बडगा हवाय

जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आयएएस दर्जाचे अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत. विकासकामातील गैरप्रकारांना आळा निश्‍चितपणे बसू शकेल, यावर नागरिकांचा विश्वास आहे. एकदा भ्रष्ट कामांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारा, बिघडलेली यंत्रणा सुतासारखी सरळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. असे घडले तर ‘जीवनाने छळले होते...’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT