वरोरा (चंद्रपूर) : शीतल आमटे करजगी यांच्या सासू सुहासिनी करजगी यांनी आमटे कुटुंबीयांचा उल्लेख करत एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये शीतल यांना मानसिक त्रास असताना दूर का लोटले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. शीतल यांच्या आत्महत्येबाबत त्यांनी आमटे कुटुंबीयांकडेच बोट दाखविले होते. मात्र, आता ही पोस्ट आता सोशल मीडियावरून डिलिट करण्यात आली आहे.
काय होती फेसबुक पोस्ट? -
''हे पत्र मी दोन दिवांपूर्वीच लिहिले होते व आज तिच्या कुटुंबीयांन ( संपूर्ण आमटे परीवार) कडून तिला दिला गेलेला त्रास तिला सहन न झाल्यामुळे तीनी स्वतःला संपवले......The End. २५-११-२०२० च्या लोकसत्ता व अनेक पेपरमधे शीतलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले व आश्चर्य पण वाटले. ह्यावर काही प्रतिक्रिया द्यावी की चूप रहावे हे कळत नव्हते. परंतु, शेवटी विचार केला की शितल 'आमटे' असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे, तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल? आमटे कुटुंबांनी (तिच्या स्वतःच्या आई- वडिलांनी व काका- काकूंनी) तिचा बद्दल असे संयुक्त निवेदन( स्वाक्षरी करून) द्यावे ह्यासारखी लाजीरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते?
ज्या दिवशी 'गौतम-शितल'चे लग्न झाले. त्यादिवशीपासून शितलला मी माझी मुलगीच मानले आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काहीं प्रश्न विचारते.
1. शीतलनी संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असं तुम्हीच लिहले आहे. मग जर शीतलला आज काही मानसिक ताण व नैराश्य आहे, तर तिला संभाळणे व आपुलकीने तिला जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे?
कारण आनंदवनात सगळया handicapped ( mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते. मग सख्ख्या मुलीबाबत बोभाटा का? की या मागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे?
डॉ. प्रकाश आमटे यांना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद का साधता आला नाही त्यांना? सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय?
2. कौस्तुभ आमटे ह्यास परत विश्वस्थ मंडळावर घेतले. त्याबाबत मला विचारावेसे वाटते की त्याला काढले का होते? खास गोष्ट म्हणजे ज्या सगळया ट्रस्टींनी त्याला काढले त्यांनीच त्याला परत घेतले. तर आमचासारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्यामागचे कारण काय होते? व आता परत घेतले तर त्यानी अशी काय विशेष कामगिरी केली? मागचा 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटेचे नाव पण कुठे वाचण्यात आले नाही. इतके वर्ष तो होता कुठे? की आमटे कुटुंब पण सर्व सामान्य माणसांप्रमाणे मुलगा ( घराण्याचा वारस) आणि मुलीमधे फरक करतात?
आज मी सर्वांना खुले आव्हान करते की आनंदवनला जावे व शीतल आणि गौतमने जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे आणि मग काय ते ठरवावे.
आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला-मुलींमधे फरक करावा ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही का?
उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षांत ठेवा।
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षांत ठेवा।
कौस्तुभ आमटे च्याबाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील.
ज्या प्रचंड गतीने व डेडीकेशनने आज व मागच्या अनेक वर्षांपासून शीतल व गौतमनी आनंदवनात काम केले आहे. त्याला तोडच नाही. त्याबद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो. ईथे मला आमटे लोकांना आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढे प्रचंड जबाबदारीचे काम कसे काय करू शकेल?
आज आत्ता मी आनंदवनातच आहे व शितल व गौतम शिवाय ईथे आमटे कुटुंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही. तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शितल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंटची काळजी घेते आहे. मग ती जर स्वत: मानसिकरित्या आजारी आहे ( तीच्या आई-वडीलांनी पत्रात लीहल्या प्रमाणे) तर सगळे आमटे तिच्या भरोशावर पूर्ण आनंदवन सोडून हेमलकशाला काय करत आहेत? सगळे आमटे शितल- गौतमच्या विरूध्द कट-कारस्थान तर रचत नाहीए ना?
विकास आमटे व प्रकाश आमटेंबद्दल हे सगळं लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्भाग्यच आहे. शीतलला कसलाही मानसिक त्रास नाही व हा त्रास तिच्यावर जबरदस्ती लादला जातोय व तो पण तिच्या सख्या आई-वडीलांकडून हे तीचे खंर दुर्भाग्य आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आमचे पूर्ण करजगी कुटुंब सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व पुढे पण राहू.''
-सुहासिनी करजगी व शिरीष करजगी
दरम्यान, ही पोस्ट आता सोशल मीडियावरून डिलिट करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी आमटे कुटुंबीयांनी निवेदन जारी करत शीतल यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरच काही दिवसात ही घटना घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.