Krishna Karale sakal
विदर्भ

Crime News : 'त्या' अपवृत बालकाचा खून झाल्याचे उघड; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शेगाव शहरातून अपहरण झालेल्या एका तेरा वर्षे पाच महिने वयाच्या बालकाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (बुलढाणा) : शहरातून अपहरण झालेल्या एका तेरा वर्षे पाच महिने वयाच्या बालकाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याची घटना 25 जुलै रोजी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू होती.

तालुक्यातील नागझरी येथील तेरा वर्षे पाच महिने वयाचा एक लहान बालक शेगाव येथे चित्रकला चौकात असलेल्या ट्युशन क्लासला आला होता. 23 जुलै रोजी संध्याकाळी पाच ते साडेसहा वाजे दरम्यान त्याचे अपहरण करण्यात आले होते. सदर अपहरण झालेला बालकाचा 25 जुलै रोजी सकाळी भेंडवळ ते मडाखेड रोडवरील जंगलात मृतदेह आढळून आला.

या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर बालकाला गावातीलच तीन जणांनी संगणमत करून जीवे ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात नागझरी येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, हे अद्याप उघड झालेले नसले तरी लवकरच ते समोर येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या घटनेबाबत माहिती अशी, कृष्णा राजेश्वर कराळे, वय तेरा वर्षे पाच महिने हा मुलगा नागझरी येथून शेगाव येथील चित्रकला चौकामध्ये ट्युशन क्लाससाठी 23 जुलै रोजी संध्याकाळी आला होता. ट्युशन वरून घरी परत न आल्यामुळे त्याचे नातेवाईक चिंतेत होते.

त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने शेवटी त्याचे काका गोपाळ देविदास कराळे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने माझा पुतण्या कृष्णा राजेश्वर कराळे याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. व याबाबत फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी कलम 137(2) अन्वय भारतीय न्याय संहिता नुसार अपहरणचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान पोलीस तपासामध्ये एका आरोपीला जळगाव जामोद येथे 24 जुलै रोजी राहतील संध्याकाळी अटक करण्यात आली. व त्याने सांगितलेल्या लोकेशन नुसार भेंडवळ भास्तन शिवारामध्ये पोलिसांनी बालकाचे सर्च ऑपरेशन केले. मात्र रात्र असल्यामुळे मुलाचा शोध लागला नव्हता.

म्हणून 25 जुलै रोजी सकाळी परत सर्च मोहीम सुरू झाली व आरोपीने सांगितल्यानुसार पोलिसांना घटनास्थळ गवसले भेंडवळ ते मळा खेळ रस्त्यावरील एका नाल्यांमध्ये आरोपींनी सदर बालकाचा खून करून मृतदेह टाकून दिलेला आढळला. या घटनेमुळे सर्वत्र शोक कळा पसरली.

तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशन समोर मृतकाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी बालकाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी .अशी मागणी उपस्थित नातेवाईकांच्या आक्रोशातून समोर आली. पोलीस स्टेशन समोर झालेला जमाव गर्दी पांगवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता.

यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटील,जळगाव जामोद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेंनजीत पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उमेश पाटील, केशव हिंगणे व इतर काही नेत्यांनी उपस्थित लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर गर्दी थोडी कमी झाली.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन तसेच घटनास्थळाला भेट दिली. व घटनेचे गांभीर्य समजून घेतले. खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, मेहकर एस. डी पी ओ प्रदीप पाटील, शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील, तसेच शेगाव ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर व इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी यावेळी हजर राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

गावात चोख बंदोबस्त..

मृतक बालक व यातील एक आरोपी एकाच गावाचे असल्याने नागझरी गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT