रेखाटले तिळावर छत्रपती sakal
विदर्भ

Shiv Jayanti 2023 : अभिषेक रुद्रवारने रेखाटले तिळावर छत्रपती

बारीक अशा तिळावर छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती करण्यासाठी त्याने पाच दिवस सराव केला

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील श्रद्धा कलावंतांच्या मनातही दाटून येते. पुसद येथील युवा कलावंत अभिषेक रूद्रवार याने तिळावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रेखाटून एक आगळावेगळा विक्रम केला. रविवारी (ता.१९) असलेल्या शिवजयंती निमित्त ही कलाकृती त्याने तयार केली.

बारीक अशा तिळावर छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती करण्यासाठी त्याने पाच दिवस सराव केला व तीन तासांत ही कलाकृती साकारली. भिंगाचा वापर न करता ही कलाकृती तयार केलेली आहे. साधारणपणे त्याला तिळाचा तीन दशांस मिलिमीटर एवढा आहे.

पुसदच्या अभिषेक रुद्रवारला ’मायक्रो आर्ट’ मध्ये आवड आहे. पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या मनस्वी कलावंताने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने १६ मिनिटे २० सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले. त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली.

पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेजमध्ये बीएफए अंतिम वर्षाला शिकत आहे. मुळात तो कलावंत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचिसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तिळावर चक्क त्याने ए,बी,सी,डी यांसारखे इंग्रजी मुळाक्षरे तर १ ते १० पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलाकृती प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT